Maharashtra Cabinet : नाशिकमधून कोण होणार मंत्री?

Maharashtra Election Result 2024 : राज्यात महायुतीला अपेक्षेपेक्षा चांगले यश प्राप्त झाले जिल्ह्यात देखील महायुतीचा चांगलाच डंका वाजला. त्यामुळे राज्यात महायुतीचीच सत्ता येणार आहे.
Maharashtra Assembly
Maharashtra Assembly Agrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्यात महायुतीला अपेक्षेपेक्षा चांगले यश प्राप्त झाले जिल्ह्यात देखील महायुतीचा चांगलाच डंका वाजला. त्यामुळे राज्यात महायुतीचीच सत्ता येणार आहे. आता सत्य बरोबरच मंत्रिपदाची देखील स्पर्धा लागले असून नाशिकमधून कोणाला संधी मिळते याबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ व नरहरी झिरवाळ त्याचबरोबर शिवसेनेचे दादा भुसे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. नवख्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाग म्हणून विजयाची हॅटट्रिक करणारे डॉ. राहुल आहेर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे तसेच ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्या मतदारसंघातील प्रतिनिधीम्हणून ॲड राहुल ढिकले यांची नावे समोर येत आहे.

राज्यात मतदारांनी महायुतीला भरभरून यश दिले. यात नाशिक जिल्ह्याचा देखील मोठा वाटा राहिला. महायुतीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने देखील चांगल्या जागा मिळविल्या. त्यामुळे जम्बो मंत्रिमंडळाचे संकेत मिळत आहे. नाशिक मधून देखील मंत्रिपदासाठी अनेकांची दावेदारी तयार झाली आहे.

Maharashtra Assembly
Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

आमदारांच्या पक्षनिहाय संख्येचा विचार केल्यास भाजपकडे अधिक मंत्री पदे जातील. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडे मंत्री पदे राहणार आहे. महायुतीच्या गत सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे मंत्री होते.

नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा नाशिक जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी दावा राहील. जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या दोनच जागा निवडून आल्या आहेत मागील सरकारमध्ये दादा भुसे हे मंत्री होते त्यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाचे देखील जबाबदारी होती. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रीपदासाठी त्यांचा दावा राहील. भाजपमध्ये मात्र मंत्री पदासाठी स्पर्धा राहणार असल्याचे चित्र आहे.

Maharashtra Assembly
Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

भाजपमध्ये नवीन चेहऱ्याचा शोध

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये चांदवड- देवळा येथील जाहीर सभेमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ राहुल आहेर यांना महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिले स्थान दिले जाईल, असे आश्वासन दिले होते.

त्यामुळे डॉ. आहेर यांचा मंत्रिपदावर दावा राहील. त्यानंतर आमदारकीची हॅटट्रिक केलेल्या व महिला प्रतिनिधी म्हणून प्रा देवयानी फरांदे व सीमा हिरे यांचा देखील मंत्रिपदावर दावा राहील. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासूम्हणून आमदार ढिकले यांच्या गळ्यात देखील मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com