Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालाचा कौल मतदारांनी पुन्हा महायुतीला दिला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या पश्‍चिम विदर्भात महायुतीच्या उमेदवारांचा बोलबाला राहिला आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024
Maharashtra Assembly Election Result 2024 Agrowon
Published on
Updated on

Akola News : विधानसभा निवडणूक निकालाचा कौल मतदारांनी पुन्हा महायुतीला दिला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या पश्‍चिम विदर्भात महायुतीच्या उमेदवारांचा बोलबाला राहिला आहे. विजयी झालेल्या आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार श्‍वेता महाले, आमदार हरीष पिंपळे या प्रमुख उमेदवारांचा विजय झाला. तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार राजेश एकडे, राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेनेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना मतदारांनी नाकारले आहे.

यंदाची ही निवडणूक महायुती, महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे निकालाची सर्वत्र उत्सुकता ताणली गेली होती. शनिवारी दुपारपर्यंत अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांतील १५ जागांचे कौल समोर आले होते. अर्ध्या अधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. यात अकोला, अकोट, मूर्तीजापूर, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर, वाशीम, कारंजा या जागांचा समावेश होता.

अकोला पश्‍चिम हा मतदार संघ भाजपच्या हातातून काँग्रेसने हिसकावून घेतला. या ठिकाणी साजिद खान हे थोड्या मतांनी विजयी झाले. अकोला पूर्वमध्ये आमदार रणधीर सावरकर यांनी लाखावर मते घेत विजय संपादन केला. अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे, मूर्तीजापूरमध्ये हरीष पिंपळे हे विजयाच्या समीप पोहोचले होते. बाळापूरमध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला.

Maharashtra Assembly Election Result 2024
Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

बुलडाण्यात धक्क्यांवर धक्के

या जिल्ह्यात भाजपने जळगाव जामोद डॉ. संजय कुटे, चिखली श्‍वेता महाले, खामगाव आकाश फुंडकर या उमेदवारांच्या जागा कायम राखल्या. शिवाय मलकापूरमध्ये काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांचा पराभव करीत भाजपचे चैनसुख संचेती वियजी झाले. भाजप आता जिल्ह्यात सातपैकी चार जागांवर पोहोचला आहे. बुलडाण्यात संजय गायकवाड यांनी काठावर विजय मिळवला.

येथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जयश्री शेळके यांनी काट्याची लढत दिली. चिखलीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांना पराभव स्वीकारावा लागला. मेहकरमध्ये शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) मोठा धक्का बसला. येथे डॉ. संजय रायमूलकर यांचा पारंपरिक मतदार संघ नव्यानेच उमेदवारी मिळालेले शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सिद्धार्थ खरात यांनी हिसकावला. सिंदखेडराजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) डॉ. राजेंद्र शिंगणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार मनोज कायंदे यांनी मात दिली.

Maharashtra Assembly Election Result 2024
Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

वाशीममध्ये जोरदार लढती

वाशीममध्ये भाजपचे श्‍याम खोडे, कारंजात सई डहाके विजयाच्या मार्गावर आहेत. तर रिसोड-मालेगावची जागा काँग्रेसचे अमित झनक हे राखणार आहेत.

भाजप फायद्यात : शिवसेना, काँग्रेस तोट्यात

निकालात भाजपचा अकोला पश्‍चिम हा मतदार संघ गेला तर मलकापूर हा मतदार संघ मिळाला. भाजपला १५ पैकी ९ जागा मिळाल्या. शिवसेनेची (एकनाथ शिंदे गट) मेहकरची जागा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिंकली. काँग्रेसला मलकापूरची जागा गमावण्याचे दुःख असतानाच दुसरीकडे अकोला पश्‍चिम जिंकल्याचा आनंद समाधान देणारा आहे.

पक्षनिहाय विजय मिळालेले मतदार संघ

भाजप - अकोला (पूर्व), अकोट, मूर्तीजापूर, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर, चिखली, वाशीम, कारंजा

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) - बुलडाणा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - सिंदखेडराजा

काँग्रेस - अकोला पश्‍चिम, रिसोड

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) - मेहकर, बाळापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com