Humani Attack : विदर्भात हजारो हेक्‍टर पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव

White Grub Pest : खरीप पिकांना सध्या पोषक वातावरण निर्माण झालेले असतानाच विदर्भातील बहुतांश भागात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
Humani Pest
Humani PestAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : खरीप पिकांना सध्या पोषक वातावरण निर्माण झालेले असतानाच विदर्भातील बहुतांश भागात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हजारो हेक्‍टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी पीक हुमणीमुळे बाधित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दुर्गापूर (बडनेरा) केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा हे जिल्हे हुमणीबाधित असून हजारो हेक्‍टरवरील पिकात याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील ऊस पट्ट्यात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत होता.

Humani Pest
Humani Pest Control: ऊस पिकातील हुमणी नियंत्रणासाठी तातडीचे उपाय

यंदा पहिल्यांदाच विदर्भातील मोठ्या क्षेत्रावरील पिकांना या किडीने पोखरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या किडीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही अळी सक्रिय होत असून, जमिनीतील आर्द्रतेचा फायदा घेत ती झपाट्याने वाढते.

Humani Pest
Humani Pest Control: हुमणी किडीच्या भुंगेऱ्यांचे नियंत्रण

त्यामुळे योग्यवेळी नियंत्रण न केल्यास नुकसान वाढू शकते. ही अळी जमिनीत राहून पिकाच्या मुळांवर हल्ला करते आणि पिकांची वाढ खुंटते. हुमणीचा सर्वाधिक परिणाम कापूस, सोयाबीन, तूर पिकात झाला आहे. परिणामी काही भागात २५ ते ३० टक्‍क्यांपर्यंत उत्पादनात घट होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

यंदा सोयाबीन आणि त्यात तुरीचे आंतरपीक घेतले आहे. दहा एकरांवरील या संपूर्ण शिवारात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. किडींकडून मुळांवर हल्ला होत असल्याने पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही, असे दुर्गापूर केव्हीकेच्या तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे पीक वाळत असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आहे.
- ओंकार भस्मे वेणी गणेशपूर, ता. नांदगाव खंडेश्‍वर, अमरावती
पावसाने खंड दिल्याने सुरुवातीला चिंता वाढली होती. आता समाधानकारक पावसाने पीक बहरावर आहे. परंतु याचवेळी ३० एकरांपैकी दोन एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक हुमणीने फस्त केले. उर्वरित क्षेत्रातही प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे.
- कृष्णा कांडलकर, टाकरखेडा संभु, ता. भातकुली, अमरावती
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये या अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना विषयक जागृतीवर भर देण्यात आला आहे. केव्हीके व कृषी विद्यापीठ तज्ज्ञांची मदत याकामी घेतली जात आहे
- प्रमोद कसदन लहाळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com