Sugarcane Intercropping : उसात कोणतं आंतरपीक घ्याल?

Potato Cultivation : सध्या बऱ्याच ठिकाणी पूर्वहंगामी उसाची लागवड सुरु आहे. सुरुवातीच्या काळात उसाची वाढ हळू - हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी पुरेशी मोकळी जागा असते. या मोकळ्या जागेत बटाटा लागवड फायदेशिर ठरते.
Sugarcane Intercropping
Sugarcane IntercroppingAgrowon
Published on
Updated on

Sugarcane Crop : सध्या बऱ्याच ठिकाणी पूर्वहंगामी उसाची लागवड सुरु आहे. सुरुवातीच्या काळात उसाची वाढ हळू - हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी पुरेशी मोकळी जागा असते. या मोकळ्या जागेत बटाटा लागवड फायदेशिर ठरते. उसामध्ये आंतरपीक म्हणून बटाटा लागवड कशी करायची आणि बटाटा लागवडीचे फायदे काय आहेत याविषयीची माहिती घेऊया.

बटाटा हे आंतरपीक पूर्वहंगामी उसात घेतल्यान फुटव्यांची जोमदार वाढ होते. बटाटा पिकाला जास्त पाणी मानवत नाही. उसाला पाणी देताना आपोआप भिजलेल्या वरंब्यावर तीन महिने इतक्या कमी दिवसात बटाट्याचे आंतरपीक भरघोस उत्पादन देत. तणांची वाढ रोखली जाते आणि तणांच प्रमाणही कमी होत. जमिनीची सुपीकता वाढते याशिवाय सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात वाढ होते. आंतरपिकामुळे जमीन, पाणी, खते व सूर्यप्रकाशाचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो. साखर उताराही वाढतो.

ऊस लावल्यानंतर उगवण पूर्ण होण्यास ३ ते ६ आठवड्यांचा काळ लागतो. त्यानंतर फुटवे फुटण्यास सुरुवात होते. फुटव्यांची पूर्ण वाढ होण्यासाठी आणि संपूर्ण रिकामे क्षेत्र झाकण्यासाठी ३ ते ४ महिने लागतात. फुटव्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत दोन सरींतील जागा रिकामी राहाते. आंतरपिकासाठी ऊस लागवड ५ फुटांपेक्षा जास्त अंतरावर केल्यास मधल्या रिकाम्या जागेत आंतरपीक घेण फायदेशीर आहे. दोन सऱ्यांमध्ये असलेली ७० टक्के रिकामी जागा, जमिनीतील ओलावा आणि दीर्घकाळ मिळणारा सूर्यप्रकाश या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लाभ घेण्यासाठी आंतरपीक घेण शक्य आहे.

Sugarcane Intercropping
Agriculture Intercropping Method : आंतरपीक पद्धतीवर द्या भर

आंतरपीक म्हणून बटाट्याची लागवड कशी करावी?

पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळत केली जाते. पूर्वहंगामी उसाचा कालावधी १५ महिन्यांचा असतो. उसाची लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात केली असल्यास बटाट्याची लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बटाट्याचे हेक्टरी २० क्विंटल बेणे लागत. उसाच्या सरीतील अंतर साडेचार ते पाच फूट आणि बटाट्याच्या दोन डोळ्यांतील अंतर १५ सेंटीमीटर ठेवावे.

लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी ६ ते ७ आठवडे लागतात. उसामध्ये बटाटा घेताना एकास एक या प्रमाणात घ्यावा. सुरुवातीच्या काळात उसाची वाढ हळू - हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी पुरेशी मोकळी जागा असते. उसासाठी बियाणे, खते आणि आंतरमशागतीसाठी केलेला खर्च बटाटा आंतरपिकातून निघून जातो. आंतरपीक घेतल्याने तणांचा नैसर्गिक बंदोबस्त होऊन प्रमाण कमी होत. या पद्धतीमध्ये पहिल्यांदा तिफणीने १५० सेंटीमीटर अंतरावर उथळ सऱ्या पाडाव्यात. यामध्ये खते टाकून बटाटा बेण्याची लागवड करावी किंवा बटाटा पेरणी यंत्राने लागवड करावी. नंतर त्यामधील अंतरात उसासाठी सरी पाडावी म्हणजे बटाटा बेणे आपोआप झाकले जाईल. पडलेल्या सरीमध्ये उसासाठी खते देऊन कोरडी लागण करून पाणी द्यावे. अशाप्रकारे बटाट्याचे आंतरपीक घेता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com