

Jalgaon News : महानिर्मितीने ‘व्हिजन-२०३०’ अन्वये २५ हजार मेगावॉटपेक्षा अधिक वीज उत्पादन करण्याचा निर्धार केला होता. या अंतर्गत भुसावळात ग्रीन डायड्रोजन प्रकल्प उभारला जाणार होता. परंतु हा प्रकल्प रखडला आहे.
सात वर्षांच्या कालावधीत हे नावीन्यपूर्ण, खडतर आणि आव्हानात्मक काम असल्याने आगामी २०२४ आणि २०२५ या वर्षांत महानिर्मितीला अनेक आघाड्यांवर रणनीती आखून अतिशय नियोजनबद्ध अधिक जोमाने काम करावे लागणार आहे. तसेच कामाची गती वाढवावी लागेल, असाही मुद्दा आता उपस्थित केला जात आहे.
आता फेब्रुवारी ते ऑक्टोबर या कालावधीत विजेची मोठी मागणी असते. यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हानही आहे. मनुष्यबळाला आवश्यक प्रशिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास, नैसर्गिक साधनांची उपलब्धता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, दस्तावेज, कायदेशीर बाबी, अटी व शर्थी, जमीन अधिग्रहण यांसारखी कामे करून प्रत्यक्ष प्रकल्प अंमलबजावणी करावी लागणार आहे.
यातून ६६० मेगावॉट क्षमतेचा भुसावळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवून त्यातून वाणिज्यिक तत्त्वांवर वीज उत्पादन सुरू करणे, सौरऊर्जेवर आधारित महानिर्मितीचा भुसावळ येथे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित करणे, ६६२ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामांना गती देणे, महानिर्मितीच्या २३ संचांसाठी फ्ल्यू गॅस डी सल्फरायझेशन संयंत्र उभारणी करून त्या कामांना गती देणे,
मेसर्स एसजेव्हीएन, महाऊर्जा, राहुरी कृषी विद्यापीठ यांच्यासमवेत झालेल्या करारानुसार कार्यवाही करणे, आदी कामांना कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे महानिर्मितीने म्हटले होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर पावसाळा आला. यात कामे रखडली. त्यात विधानसभा निवडणूक आली. यात सर्वच कामे रखडल्याची स्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.