Pune News : देशात वीजेच्या वाढत्या मागणीमुळे अनेक राज्यांमध्ये वीज निर्मितीचे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. असाच देशातील पहिला प्रयोग प्रायोगिक तत्वावर हिमाचल प्रदेशातील झाकरी येथे करण्यात आला आहे. झाकरी येथील नाथपा झाकरी जलविद्युत केंद्रात (एनजेएचपीएस) मध्ये १५०० मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मितीचा पहिला पायलट प्रोजेक्ट करण्यात आला आहे. हा बहु-उद्देशीय असून उष्णता व विद्युत दोन्हींसाठी संयुक्त आहे. हरित हायड्रोजन, एनजेएचपीएस मधील ज्वलन-इंधनाची गरज भागवण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट महत्वाचा ठरणार आहे.
देशातील पहिल्या बहु-उद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर यांनी २४ एप्रिल २०२४ ला केले आहे. यावेळी कपूर म्हणाल्या, "भारत सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाला अनुसरून एसजेव्हीएनचा हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या पायलट प्रकल्पामुळे विद्युतक्षेत्रात हरित हायड्रोजन निर्मितीच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यास मदत मिळेल. तसेच ८ तासात १४ किलो हरित हायड्रोजन निर्माण केला जाईल. यामुळे हरित हायड्रोजन हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत प्राप्त होईल.
पायलट प्रकल्पाचे कारण?
सध्या देशातील वीजेची वाढती मागणी असून वीजेचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. यामुळे हरित हायड्रोजन निर्मितीकडे लक्ष दिले जात आहे. तसेच भविष्यातील हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहणांचा देखील येथे विचार केला गेला असून हरित हायड्रोजनच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान अंतर्गत ऊर्जा मंत्रालयाकडून वाहतूक क्षेत्रात जीवाश्म इंधनांच्या जागी हरित हायड्रोजनच्या वापरासाठी आग्रह धरला जात आहे. यासाठी डेरिव्हेटिव्ह्जसह प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवेल जात आहेत.
ग्रीन हायड्रोजनचे उपयोग
प्रकल्पात तयार होणारा हिरवा हायड्रोजन एनजेएचपीएसच्या हाय व्हेलॉसिटी ऑक्सिजन इंधन (HVOF) कोटिंग सुविधेवर त्याच्या ज्वलन इंधनाच्या गरजांसाठी वापरला जाईल. यासोबतच २५ किलोवॅट क्षमतेच्या फ्युएल सेलद्वारे वीजनिर्मितीही केली जाणार आहे.
इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनचा वापर
या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पातून बसेस, ट्रक आणि ४-चाकी वाहनांमध्ये इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या विकासाला पाठबळ दिला जाईल.
दररोज १४ किलो ग्रीन हायड्रोजन
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दररोज ८ तासात १४ किलो ग्रीन हायड्रोजन तयार करण्यात येणार आहे. तर हा तयार होणारा हायड्रोजन ३० बारच्या दाबाने सहा साठवण टाक्यांमध्ये साठवण्यात येईल. ज्याची क्षमता १२m३ आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.