Onion Jalgaon News : खानदेशात अनेक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कांदा चाळ मंजूर झाल्या आहेत. कांदा चाळींची उभारणी वेगात सुरू आहे. पंचवीस मेट्रीक टनसाठी ८७ हजार ५०० चे अनुदान उपलब्ध होत असते.
मागील काही वर्षांत लोखंडासह, पत्रा, मंजुरी इतर सर्व गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत. शासनाचे अनुदान तुटपुंजे ठरत आहे. अनुदान दीडपटीने वाढून मिळण्याची मागणी खानदेशातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
खानदेशात धुळे व साक्री, जळगावात चाळीसगाव, यावल, चोपडा, जळगाव तालुका कांदा उत्पादनासाठी आघाडीवर आहे. कांदा साठविण्यासाठी शेतकऱ्यांकडे चाळी नाहीत. शेतकऱ्यांना कांदा काढणी नंतर लगेचच विकावा लागतो.
काढणी सुरु झाल्यानंतर भाव पडलेले असतातच. अशा स्थितीत कांद्याचा काढणी खर्चही निघत नाही. सध्याही उन्हाळी कांदा काढणी सुरु झाली आहे. भाव उतरले आहे. शेतकऱ्यांची स्थिती नाजूक झाली आहे. भाववाढीची मागणी सुरु झाली आहे.
कांदा चाळी राहिल्यास चार सहा महिने साठवणूक करता येते. कांद्याला उत्पादन खर्चावर अथवा हमी भाव मिळाल्यास परवडणार आहे. मात्र शासनाचे शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याची खंत कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करतात.
अनुदान वाढवा
कांदा चाळ उभारण्यासाठी पंचवीस मेट्रीक टन साठवणूक क्षमतेसाठी ८७ हजार ५०० चे अनुदान उपलब्ध आहे. गेल्या वर्षभरापासून लोखंडासह, पत्रा, मंजुरी इतर सर्व गोष्टींच्या किंमती वाढलेल्या आहेत. सध्या लोखंडाचे भाव सहा हजारांवरून आठ हजारावर पोचले आहेत. शासन अनुदान कुचकामी ठरत आहे. अनुदान दुप्पटीने वाढीव मिळावे, अशी मागणी कांदा उत्पादक करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.