Financial Loan : कर्ज केव्हा, का, कसे मिळवायचे ?

Loan System : मालमत्ता उभारण्यासाठी म्हणजेच उद्योग, घर, जमीन यासाठी कर्ज घेतले तर भविष्यात आपल्याला उत्पन्न मिळते. पण केवळ खर्चिक बाबींसाठी कर्ज घेत राहिलो तर सतत बोजा वाढत जातो.
Loan
LoanAgrowon
Published on
Updated on

कांचन परुळेकर

Financial Loan Management : मालमत्ता उभारण्यासाठी म्हणजेच उद्योग, घर, जमीन यासाठी कर्ज घेतले तर भविष्यात आपल्याला उत्पन्न मिळते. पण केवळ खर्चिक बाबींसाठी कर्ज घेत राहिलो तर सतत बोजा वाढत जातो. मालमत्ता नेहमी आपल्या खिशात पैसा टाकते. आपले भरण पोषण करते. पण खर्चाच्या बाबी, देणे आपल्या खिशातून पैसा काढून घेतात. ही स्थिती टाळायची असेल तर आपण विचारपूर्वक कर्ज उचल करायला हवी.

अर्थसाक्षरतेच्या पहिल्या तीन भागांत आपण हाती येणाऱ्या पैशाचे योग्य नियोजन करून गरिबीच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडणे किंवा गरिबीच्या चक्रात न गुरफटणे यासाठी काय करता येईल, याबाबत माहिती घेतली.मागील भागातील सर्व बाबींचा अवलंब करत असाल, तर आपण योजनाबद्ध जीवन जगणारी यशस्वी व्यक्ती ठरू शकता.

यासाठी काही गोष्टींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भारतात बहुसंख्य लोक योजनाविरहित जीवन जगतात. बऱ्याच जणांना कर्जाची सवय किंवा व्यसनच जडलेले असते. कर्ज उचलताना पुढचा मागचा विचार न करता ते उचलले जाते. व्याज आकारणी कशी होते ते माहीत नसल्याने बोजा वाढतच जातो. बऱ्याचदा ज्या आधारावर कर्ज घेतलेले असते ती मालमत्ता कर्ज, वाढते व्याज यामुळे नाहीशी होते.

मालमत्ता उभारण्यासाठी म्हणजेच उद्योग, घर, जमीन यासाठी कर्ज घेतले तर भविष्यात आपल्याला उत्पन्न मिळते. पण केवळ खर्चिक बाबींसाठी कर्ज घेत राहिलो तर सतत बोजा वाढत जातो. मालमत्ता नेहमी आपल्या खिशात पैसा टाकते. आपले भरण पोषण करते. पण खर्चाच्या बाबी, देणे आपल्या खिशातून पैसा काढून घेतात.

आपल्यालाच खाऊन टाकतात. ही स्थिती टाळायची असेल तर आपण विचारपूर्वक कर्ज उचल करायला हवी. संस्था किंवा व्यक्तीकडून ठराविक तारखेपर्यंत परत करण्यासाठी घेतलेली रक्कम म्हणजे कर्ज. ठराविक दराने त्यावर व्याज आकारणी केली जाते अन ठरवून दिलेल्या तारखांना परतफेडीच्या रूपात ती भरावी लागते.

Loan
Orange Crop Insurance : विमा परताव्यात संत्रा फळगळतीचा निकषच नाही

कर्ज घेण्याची कारणे

उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढते, त्या वेळी कर्ज घेतात. घर, जमीन अशी मालमत्ता जवळ असते, पण त्याचे त्वरित पैशात रूपांतर करता येत नाही. अशावेळी उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर कर्ज उचलले जाते. दैनंदिन उत्पन्न नाही, खर्च मात्र रोजच करावा लागतो. अशावेळी कर्ज हाच आधार ठरतो. कर्ज काढल्यानंतर भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम होणार असतात.

परतफेड अतिशय महत्त्वाची असते. ती करण्यासाठी कर्ज घेण्यापूर्वीच हिशेब करून, अंदाज घेऊन कर्ज उचलणे उचित असते. परंतु काही लोक कोणताही विचार न करता भावनेच्या भरत कर्ज उचलतात. कोणताही आर्थिक प्रश्न कर्जाने चुटकीसरशी सुटतो अशी त्यांची समजूत असते.

दुसरी गोष्ट म्हणजे खासगी सावकार चुटकीसरशी कर्ज द्यायला आनंदाने तयार असतात. व्याज किती, ते कसे मोजणार याचा लोकांना पत्ताच नसतो. आली अडचण, घे कर्ज. पहिले कर्ज फेडण्यासाठी दुसरे जादा कर्ज. स्वतःहूनच ते कर्जाच्या विळख्यात अडकत जातात.

बँकेकडे कर्ज मागितले तर कागदपत्रे द्यावी लागतात, अर्ज करावा लागतो. खरं म्हणजे बँक तुम्हाला कर्जफेडीचा विचार करणे, परतफेडीचे गणित मांडणे यासाठी वेळ देत असते. कागदपत्रे भरताना विचार करावाच लागतो. पण तेवढा वेळ देण्याची आपली तयारी नसते.

ही मानसिकता ध्यानी घेऊन, सरकार जनधन योजना लाभार्थ्यांना पाच हजार रुपयांपर्यंतचा ओव्हर ड्राफ्ट देत आहे. पाच हजारांच्या मर्यादेपर्यंतच कर्ज बँकेतून त्यांना त्वरित मिळत आहे. तेही सावकारापेक्षा कमी व्याजाने. योग्य प्रकारे परतफेड होत राहिली तर कायमपणे हे पाच हजार त्यांच्या मदतीला उभे राहतील.

योजनाबद्ध जीवन जगणारी व्यक्ती योजनाविरहित जीवन जगणारी व्यक्ती

आपल्या एकंदर स्थितीचा विचार करून आर्थिक योजना बनविते. आपल्या परिस्थितीचा विचार न करता खर्च करते.

आपली आवक लक्षात घेऊन पैशाबद्दलचे निर्णय घेते आणि त्या निर्णयाचा परिणाम, लाभ तपासते. कोणताही मागचा पुढचा विचार न करता पैशाबद्दलचे निर्णय घेते.

ठरावीक रक्कम नियमितपणे बचत करून गुंतविते. बचतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष किंवा अनियमित बचत.

गुंतवणुकीबाबतच्या सर्व सेवांचा लाभ घेते. गुंतवणूक सेवांचा वापर करत नाही.

पैशाच्या अडचणी आणि कर्जाचा विळखा यात अडकत नाही. गरज पडताच, अडचण येताच कर्ज, हात उसने, यामुळे कायम कर्जाच्या विळख्यात अडकलेली असते.

बाजूला ठेवलेल्या पैशातून आकस्मिक खर्च भागविते. आकस्मिक खर्चाचा विचार करून साठवणूक नसल्याने जास्त कर्ज काढते.

प्रत्येक पैशाचा निर्णय भविष्याचा विचार, फायदेशीरतेची कसोटी लावून घेते. फक्त आत्ताच्या क्षणाचा विचार करून, फायदेशीरतेची कसोटी न लावता निर्णय घेते.

हाती येणाऱ्या पैशातून जादा उत्पन्नाचा स्रोत बनविते. पैशातून अतिरिक्त उत्पन्न नाही. दैनंदिन कामाईवर अवलंबून.

विमा सुरक्षेततेचा वापर करते. विम्यासारख्या सोयीचा लाभ न घेता मोठी आपत्ती, जादा कर्ज आणि उसनवारी.

स्वप्नपूर्ती करू शकते. कर्जबाजारी झाल्याने स्वप्ने अपूर्ण राहतात.

कर्जावरचे व्याज आणि कर्ज रक्कम

सध्या आपण गरज पडली, की सावकार, सूक्ष्मवित्त संस्था, बचतगट यांच्याकडून सतत कर्जाची उचल करत असतो. हे कर्ज भविष्यात आपल्याला किती खर्चिक ठरेल याचा त्या क्षणी विचार केला जात नाही.

जेव्हा कर्जावरचे व्याज आणि कर्ज रक्कम फेडण्याची वेळ येते, तेव्हा आपल्यासमोर अडचण उभी राहते. कर्ज देता गोड बोलणारा, हसतमुखाने बोलणारा सावकार, सूक्ष्म वित्त अधिकारी अन बचत गट सदस्य एकदम कठोर बनतात.

Loan
Financial Planning : आर्थिक नियोजनातूनच होईल बचत

कर्जफेड करता आली नाही तर तारण ठेवलेली मालमत्ता जप्त केली जाते. कधी कधी पहिले कर्ज, व्याज फेडीसाठी दुसरे जास्त रकमेचे कर्ज उचलले जाते. अशा प्रकारे आपण कर्जाच्या जाळ्यात गुरफटतो. मालमत्ता, भांडवल तर निर्माण होतच नाही उलट जी काही शिल्लक असते ती कमी होत जाते.

सतत कर्जाची चिंता मन पोखरत जाते. अस्वस्थता कुटुंबात दुःख निर्मिती करते. त्यामुळे प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊन आजारपण, अस्वच्छता आपल्या भोवती पिंगा घालू लागते. घरातील, घराबाहेरील लोकांचे संबंध बिघडू लागतात. मुलांचे शिक्षण, व्यवसाय, लग्नात अडथळे निर्माण होतात. राग, भांडणे, अनादर यामुळे मारामाऱ्या, भांडणे, भीती, दहशत यात पुरते गुरफटून जायला होते.

आत्मविश्वास हरवतो. सुटकेचा श्वास घेता येत नाही. सन्मान नाहीसा होतो. समाजातील पत घसरू लागते. शेवटी शेवटी कोणी दरातही उभे करून घेत नाही. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी किंवा अशा स्थितीला पोहोचता कामा नये म्हणून आजच गेल्या सहा महिन्यात आपण खालील वा अन्य कोणत्या बाबींसाठी किती कर्ज घेतले आहे, परतफेड करून किती देणे लागतो, हे लिहून काढावे.

१. घरगुती गरजा

अन्न, घरभाडे वा घर दुरुस्ती, कपडे, मुलांचे शिक्षण.

२.सामाजिक रीती रिवाज

प्रवास/ यात्रा, सण समारंभ, लग्न.

३.आकस्मिक घटना

अपघात, दवाखाना, आजारपण, मृत्यू, पूर/वादळ/भूकंप, नैसर्गिक आपत्ती.

४.करमणूक व व्यसने

तंबाखू, सिगारेट, दारू, उधारीने खरेदी, धाबा, हातगाडीवरचे खाणे, हॉटेलिंग, सिनेमा, नाटक, तमाशा.

५.व्यवसायासाठी मालमत्ता

कच्चा माल खरेदी, दुकान, मशिन, साधने.

६. व्यक्तिगत व कौटुंबिक मालमत्ता

घर, वाहन, सोने, चांदी, दागिने, शेत, टीव्ही, फ्रीज, मोबाइल.

वरील नोंदी करत असताना आपल्या लक्षात येईल, की आपण इतक्या बेफिकिरीने कर्ज उचल करतो की, प्रत्येक कारणासाठी किती कर्ज घेतले हे आपल्या लक्षातही नसते. मात्र कोणाकडून घेतले तेवढेच ध्यानी असते. मुद्दल, व्याज याबाबत काही लक्षात न ठेवता आपण फक्त परतफेडीचा हप्ता लक्षात ठेवतो. आता असे करायचे नाही.

परतफेडीचा तक्ता

दुसरे कर्ज काढण्यापूर्वी कुटुंबाने किती कर्ज काढले आहे? दरमहा मुद्दल + व्याज किती फेडावे लागते? थकीत मुद्दल व व्याज किती आहे याची नोंद करावी. खालीलप्रमाणे तक्ता कायम नजरेसमोर ठेवावा.

तक्ता क्र. १ महिना :

कोणाकडून कारण देणे कर्ज थकित हप्ता देय हप्ता कर्ज घेतले?

तक्ता क्र. २ महिना :

कोणाला थकित कर्ज देणे हप्ता रक्कम फेडली देणे रक्कम हप्ता दिला

जुने कर्ज त्वरेने फेडण्यासाठी प्रथम सूत्रात सांगितल्याप्रमाणे पैशाचे नियोजन करा आणि लवकरात लवकर जुन्या कर्जातून मुक्त होणे आवश्यक आहे.

०२३१-२५२५१२९

(लेखिका कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com