Wheat Pest : गव्हाच्या ओंब्या वाळू लागल्या; दाणेही गायब

Wheat Production : यंदाच्या हंगामात गव्हाच्या पिकाला खोडकिडीने मोठा फटका दिला आहे. आता पीक ओंब्यांच्या अवस्थेत आहे. पिकातील ओंब्या वाळत असून त्यात दाणेही भरलेले नाहीत.
Wheat Production
Wheat ProductionAgrowon
Published on
Updated on

Akola News : यंदाच्या हंगामात गव्हाच्या पिकाला खोडकिडीने मोठा फटका दिला आहे. आता पीक ओंब्यांच्या अवस्थेत आहे. पिकातील ओंब्या वाळत असून त्यात दाणेही भरलेले नाहीत. यामुळे उशिराच्या टप्प्यात लागवड असलेल्या गव्हाच्या पिकाचे उत्पादन कमालीचे घटण्याची शक्यता आहे.

या अनुषंगाने दानापूर (ता. तेल्हारा) परिसरातील काही शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत मार्गदर्शन करण्यासह मदतीची मागणीही केली आहे. जिल्ह्यात काटेपूर्णा, वाण या दोन्ही प्रमुख प्रकल्पांवरून सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी मिळाल्याने लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.

Wheat Production
Wheat Harvesting : गहू मळणीसाठी एकरी ३५०० रुपयांपर्यंत दर

जिल्ह्यात रब्बीत २८ हजार, बुलडाणा जिल्ह्यात ५७ हजार तर वाशीममध्ये ३८ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. तिन्ही जिल्ह्यांत सरासरीच्या १०० ते १४० टक्क्यांपर्यंत हे क्षेत्र पोचले.

Wheat Production
Wheat Harvesting : गहू सोंगणीची कामे अंतिम टप्प्यात

पीक चांगले आले. मात्र, आता पिकातील काही ओंब्या आपोआप वाळत आहेत. या ओंब्यांमध्ये दाणे सुद्धा भरू शकलेले नाहीत. या बाबत माळेगाव बाजार महसूल मंडलातील दानापूर येथील काही शेतकऱ्यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले.

रब्बीत १० एकरांत गहू पेरला. मात्र, गहू ओंबीवर व दाणे भरण्याच्या प्रकियेत असताना मर रोग आल्याने गव्हाच्या उत्पादनात घट होईल. त्यामुळे लागवडीचा खर्च निघणार नाही.
- घनश्‍याम फाफट, शेतकरी, दानापूर, जि. अकोला
खोडकिडीची अळी जमिनीलगत खो; पोखरून खाते. अशात ओंब्या व ओंबीची दांडी वाळते. नियंत्रणासाठी क्विनलफॉस या कीटकनाशकाची योग्य प्रमाणात घेऊन विशेष करून प्रादूर्भाव दिसू लागल्यावर फवारणी करणे, पुढील वर्षी खोडकीड प्रतिकारक वाणांची पेरणी करणे, असा उपाय होऊ शकतो.
- डॉ. भरत गिते, शास्त्रज्ञ, पंदेकृवि, कृषी संशोधन केंद्र, वाशीम.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com