लोक काय म्हणतील?

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्या प्रत्येक कृतीची तो समाजातल्या इतरांशी पडताळणी करून बघत असतो.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon

शंकर बहिरट

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्या प्रत्येक कृतीची तो समाजातल्या इतरांशी पडताळणी करून बघत असतो. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे असे वाटणे चुकीचे नाही. लोक काय म्हणतील, या भीतीपोटी प्रत्येक जण चांगले वागण्याचा प्रयत्न करीत असतो. समाजात वावरणारा माणूस किमान स्वतःची चांगली बाजू दाखवायचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याचवेळी अप्रतिष्ठा होईल अशी स्वतःची दुसरी बाजू तो लपवण्याचा प्रयत्न करीत असतो. आपली कोणतीही गोष्ट लपवण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा कारण लपवलेली कोणतीही गोष्ट फार काळ लपून राहत नाही. कधी ना कधी बिंग फुटतेच आणि समाजात चर्चेचा विषय होतो. वर्षानुवर्षे परिश्रम घेऊन मिळवलेली प्रतिष्ठा काही क्षणात जाते. समाजात नाचक्की होते. यातून आलेल्या नैराश्याने अशी माणसे एकलकोंडी बनतात. प्रतिष्ठा गेली म्हणजे जीवन संपले असे त्यांना वाटू लागते.

आपल्या कामातून समाजाची सेवा करणारा दुर्दैवाने प्रतिकूल परिस्थिती आली तरी न डगमगता प्रसंगी कसलेही काम करण्याची तयारी असणारा माणूस लोक काय म्हणतील? याचा विचार करीत नाही. कारण त्याच्या लेखी समाजाने दिलेल्या प्रतिष्ठेपेक्षा तो स्वतःच्या आयुष्याला जास्त किंमत देत असतो. अवास्तव प्रतिष्ठेसाठी लोक आयुष्य पणाला लावतात. लोक काय म्हणतील या भीतीपोटी अनेक नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, नव्या विचारांचा कोंडमारा करून अनेक जण आपले नुकसान करून घेत असतात. समाजाभिमुख असणारा प्रत्येक माणूस जो समाजाच्या दृष्टीने हलक्या दर्जाचे काम करीत असला तरी त्याला प्रतिष्ठित मानायला हवा. कारण त्याच्या कामामुळे इतर समाज सुखाने जगत असतो.

अस्वच्छता पसरवणाऱ्या समाजाच्या दृष्टीने प्रतिष्ठित असणाऱ्या श्रीमंत व्यक्ती पेक्षा कितीतरी पटीने स्वच्छताकर्मी व्यक्ती समाजाभिमुख काम करतात. मात्र जोपर्यंत त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळत नाही. तो पर्यंत आपला समाज सुशिक्षित झाला असे म्हणता येणार नाही. माझ्या एका मित्राने उच्च पदावरची नोकरी सोडून स्वतःचा उद्योग सुरू केला. मात्र उद्योगातल्या स्पर्धेत त्याचा निभाव लागला नाही. धंद्यात अपरिमित हानी झाली. न डगमगता त्याने स्पर्धा नसलेल्या उद्योगात उतरायचे ठरवले. समाजातली खोटी प्रतिष्ठा आणि घरच्यांचा विरोध पत्करून सॅनिटरी (स्वच्छता) टँकर आणि जोडीला स्क्रॅप (भंगारचा) व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच दोन्ही उद्योगांत मोठा विस्तार करून तो श्रीमंत प्रतिष्ठित म्हणून गणला जाऊ लागला. लोक काय म्हणतील, हा विचार त्याने केला असता तर हे शक्य झाले नसते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com