Indian Agriculture : या मातीला झाले काय?

Indian Soil : मागील काही दिवसांत जणू आमचा स्वधर्म लोपला आहे अशी स्थिती झाली आहे. अधिकार संपन्न लोकांकडून जे सामान्य लोकांना अपेक्षा असते तिला तडा गेला आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

रामेश्‍वर ठोंबरे

Maharashtra Sant : महाराष्ट्र भूमी ही साधू संताची आहे. त्यामुळे या भूमीचे महत्त्व केवळ देशात नव्हे तर जगात अलौकिक आहे. ज्या मातीत चोखोबा, ज्ञानोबा, तुकाराम, नामदेव, एकनाथ असे श्रेष्ठ तपस्वी महात्मे जन्मले. ज्यांनी क्रियेतून आचरण कसे असावे हे दाखविले, ग्रंथ संपदा निर्माण केली,

सामान्य लोकांना संतांच्या मागे येता यावे म्हणून वाटा दाखवल्या. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी। सांगितले जे ऋषी साच भावे वर्तवाया।। जे ऋषी आमच्या अगोदर जन्मला आले त्यांनी मानवी जन्माचे जे कल्याण सांगितले ते इतरांना सांगण्यासाठी आम्ही जन्म घेतला आहे. महाराजांची गाथा म्हणजे पाचवा वेद जो वाचेल गाथा त्याचा शांत होईल माथा!

ज्ञानेश्वर माउलीची ज्ञानेश्वरी अद्भुत आहे अगदी पृथ्वीचा कागद आणी समुद्राची शाई केली तरी वर्णन होणार नाही. अहो संत चोखोबारायांचा केवळ एकच अभंग जगातील भेद नाहीसा करेल, इतकी अलौकिक परंपरा या मातीला सुगंधित करत असताना आम्ही मात्र यातील काहीही घेत नाही.

विमुख होईल गुरू भक्ती

आदर न करेल अतिथी

संतोष न देईल आपुलिया जाती

आता गुरूंना विसरू नका, अतिथींना मान द्या आणि ज्या परिवारात गावात जन्मलो त्यांना आपल्या कर्मातून आनंद द्या. अगदी साधी सोपी सरळ अशी धर्माची व्याख्या आहे.

Indian Agriculture
Soil, Water Checkup : शेतकऱ्यांनी माती, पाणी, तपासणी करून घ्यावी

आज गुरू शिष्य नाते, गावात असलेले वातावरण आणि आप्तांमधील जिव्हाळा या तीन बाबी मानवी जीवनाचा महत्त्वाचा पाया आहे. इतकी चांगली विचारांची परंपरा कदाचित जगातही नसेल अशी परंपरा आम्ही मोडीत काढली.

पैसे प्रिय झाले माणुसकी गुंडाळून टाकली, सौजन्य मावळून गेले, जो तो माझेच खरे म्हणतो. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये आजचे कीर्तनकार मनाचे काहीही सांगत नाहीत. काय म्हणते ज्ञानेश्वरी आणि काय म्हणते गाथा, याचे प्रमाण असल्याशिवाय मार्गदर्शन प्रबोधन करीत नाहीत.

मागील काही दिवसांत जणू आमचा स्वधर्म लोपला आहे अशी स्थिती झाली आहे. अधिकार संपन्न लोकांकडून जे सामान्य लोकांना अपेक्षा असते तिला तडा गेला आहे.

सुपीक मातीत पीक येण्याऐवजी घनदाट तण उगवावे, अशी ही परिस्थिती! ज्ञानेश्वर माउली म्हणतात, पिकाची पेरणी जाणीवपूर्वक करावी लागते, तण मात्र न पेरता उगवते. यासाठी चांगले विचार स्वतःच्या मनात जोपासण्यास शेतकरी जसे खरीप व रब्बी पिकात पेरणी करतात तसे तुम्ही तुमच्या बुद्धीत नेहमी चांगले संकल्प पेरा.

आपण सर्व खूप भाग्यवान आहोत, आपण संतांच्या नंतर जन्मला आलो. त्यामुळे त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा वाचता येऊ लागली आणि जीवन जगण्याची शैली आपल्याला सापडली. असो या भौतिक दुनियेत माणसे पैसे पैसे करतील आणि प्रेमाच्या माणसाची ओळख विसरून जातील.

त्यामुळे आमच्या मातीने संत-संगती सोडली आहे. जसे वारंवार पाणी दिल्याने जमिनीचा पोत खराब होतो तसेच काहींच्या संगतीने या मातीने उग्रपणा धारण केला आहे.

लेखक - रामेश्‍वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com