Soil, Water Checkup : शेतकऱ्यांनी माती, पाणी, तपासणी करून घ्यावी
Hingoli Agriculture News : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातील माती, पाणी, रासायनिक, सेंद्रिय खते व वनस्पती यांची तपासणी करून घ्यावी. माती परीक्षण अहवालानुसार (Soil test report) शिफारशीत खतांच्या मात्रा द्याव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी केले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (Vasantrao Naik Marathwada Agriculture University) अंतर्गत प्रयोगशाळेत माती, पाणी, रासायनिक, सेंद्रिय खते, ऊती व पाने नमुने तपासणीची सुविधा आहे.
तपासणीचे प्रकार व त्याचे प्रस्तावित दर खालीलप्रमाणे...
- माती तपासणी प्रती सँपल तपासणीसाठी ३०० रुपये
- माती तपासणी (सूक्ष्म अन्नद्रव्य) तपासणीसाठी प्रती सँपल ८०० रुपये
- माती तपासणीसाठी सँपल ३०० रुपये
- मातीचे मापदंड तपासणीचे दर प्रति सँपल १०० रुपये
- वनस्पती परीक्षण तपासणीसाठी प्रति पॅरामीटर प्रती सँपल १५० रुपये
- शेणखत आणि कंपोस्ट व सेंद्रिय खत परीक्षण या तपासणीसाठी प्रति पॅरामीटर प्रति सँपल १५० रुपये
- वनस्पती, शेणखत, कंपोस्ट खत परीक्षण यासाठी प्रति पॅरामीटर प्रति सँपल २५० रुपये
- माती परीक्षण तपासणीसाठी प्रति सँपल ८०० रुपये
- माती परीक्षण या तपासणीसाठी प्रति सँपल १२०० रुपये
- पाणी तपासणीसाठी सँपल ४०० रुपये
- माती,वनस्पती आणि सांडपाण्याच्या पाण्यापासून जड धातूचे परीक्षण ४०० रुपये आहे.
- प्रयोगशाळेच्या प्रस्तावासाठी प्रस्तावित दर २० हजार रुपये
- तर माती, पाणी आणि वनस्पती विश्लेषण प्रशिक्षणासाठी ७५ हजार रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.