PM Modi in Shirdi : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?, मोदींचा सवाल

Narendra Modi Shirdi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सवाल : शिर्डीतील सभेत अजित पवार यांच्यासमोरच शरद पवारांवर टीकास्त्र
PM Modi Shirdi
PM Modi Shirdi Agrowon
Published on
Updated on

Ahmednagar News : महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते केंद्र सरकारमध्ये दीर्घकाळ कृषिमंत्रिपदी होते. मी व्यक्तिशः त्यांचा सन्मानही करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामोल्लेख न करता शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वावरच टीकास्त्र सोडले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी ही टिप्पणी केली.

शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेत गुरुवारी (ता. २६) बोलत होते. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे लोकार्पण करण्यात झाले. या प्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, कृषिमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदी म्हणाले, की महाराष्ट्रात व देशात शेतकऱ्यांच्या नावाखाली मताचे राजकारण सुरू आहे. आम्ही मात्र देशातील शेतकरी सुखी समाधानी व्हावे यासाठी काम करत आहोत. देशामध्ये आमचे सरकार येण्याआधी शेतकऱ्यांच्या विषयावर फारशी कोणी गंभीर दखल घेत नव्हते.

केंद्रात भारतीय जनताल पक्षाचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा विकास हेच घेऊन केंद्र सरकार काम करते. त्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. आधार किमतीतून शेतीमालाला दर देणे, शेतकऱ्यांसाठी विविध योजना यातूनच शेती व सहकाराचा पाया भक्कम केला जात आहे.

PM Modi Shirdi
Sugarcane FRP : ‘भीमाशंकर’चा पहिला हप्ता ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा ; एकूण २७ कोटी ५० लाख रुपये वर्ग

मोदी पुढे म्हणाले, की देशाला गरिबीतून मुक्ती देणे ही खरी सच्ची देशभक्ती आहे. गरीब माणसाच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. देशात आरोग्यासाठी ७० हजार कोटी रुपये खर्च केले.

प्रत्येकाला घर प्रत्येक घरी पाणी आरोग्यसेवा मोफत धान्य यासह महत्त्वपूर्ण योजना आणल्या खरंतर २०१४ च्या आधी केवळ भ्रष्टाचाराचे आकडे बाहेर येत होते आता विकासासाठी खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांची आकडे समोर येत आहेत.

आमचे सरकार येण्याआधी शेतकऱ्यांची कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती आम्ही ‘पीएम किसान योजना’ सुरू करून दोन लाख ६० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. महाराष्ट्रात २६००० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी योजना’ आणली ही आनंदाची बाब आहे.

PM Modi Shirdi
Soyabean Seed : बियाण्यांसाठीच्या सोयाबीनचे दर ५ हजारांवर

‘दुष्काळ मुक्तीसाठी मदत करणार’

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत, सहकार वाढीतून शेतकरी विकास या बाबी शेतकरी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. देशात शेतकरी उत्पादक कंपनी व फेडरेशनच्या माध्यमातून शेतकरी संघटन, तंत्रज्ञानातून प्रगती साधली जात आहे.

महाराष्ट्राचा विकास हाच देशाचा विकास आहे. राज्याच्या रेल्वे विस्तारातून शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. समुद्राला वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागासाठी वळवून दुष्काळमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याचे मोदी म्हणाले.

त्रेपन्न वर्षांपासून रखडेला निळवंडे प्रकल्प पूर्ण

मोदी म्हणाले की, निळवंडेसारखा ५३ वर्षांपासून रखडलेला प्रकल्प या सरकारच्या काळात पूर्ण होत आहे. आधारभूत किमतीच्या आधारे राज्यात केवळ शंभर, दोनशे कोटी रुपयांची खरेदी व्हायची. आम्ही आतापर्यंत साडेतेरा लाख कोटींची खरेदी केली. आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी केला, तर पैशाची हमी नसे. आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्याची योजना आणली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com