Fardad Kapashi : फरदड कपाशी घेण्याचे तोटे काय आहेत?

Cotton Crop : कापसाचे वाढीव उत्पादन मिळविण्यासाठी बरेचसे शेतकरी दरवर्षी कपाशीची फरदड घेतात. पण फरदड घेण्याचे फायद्यांपेक्षा जास्त नुकसानच जास्त आहे.
Fardad Kapashi
Fardad KapashiAgrowon

Cotton Production : कापसाचे वाढीव उत्पादन मिळविण्यासाठी बरेचसे शेतकरी दरवर्षी कपाशीची फरदड घेतात. पण फरदड घेण्याचे फायद्यांपेक्षा जास्त नुकसानच जास्त आहे.  

फरदड घेतल्यामुळे नेमक काय होतं? आणि पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करावं? याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.

फरदड म्हणजे काय?

कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर एखाद पाणी देऊन पुन्हा कापूस पीक घेण्याच्या पद्धतीला फरदड कापूस म्हणतात. फरदड पिकांमध्ये चांगल्या उत्पादनासाठी पाणी, खते, कीटकनाशकांचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे कापूस पीक शेतामध्ये मार्च महिन्यानंतर राहते.   कपाशी वेचणीनंतर रब्बी नंतरच्या हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत, पेरणी आणि बियाणे अशा गोष्टींवरील खर्च वाढतो.

हा खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. या कारणामुळे फरदड पीक घेण्याची पध्दत शेतकऱ्यांना फायदयाची वाटते. पण, या पध्दतीमुळे शेतात जास्त काळ कापूस पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं. गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेतला तर तिचं चांगल नियंत्रण करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये.

Fardad Kapashi
Fardad Kapashi : तुम्हीही फरदड कपाशी घेताय का?

पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करावं?

कपाशीची फरदड न घेता वेळेवर कपाशीची वेचनी करुन डिसेंबर नंतर शेतामध्ये कपाशीचे पिक ठेवू नये. हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळया, मेंढया चरण्यासाठी सोडाव्यात. हंगाम संपल्यावर ताबडतोब प-हाट्यांचा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ कापसाच्या प-हाट्या रचुन ठेवू नये. कारण पऱ्हाटीत गुलाबी बोंडअळीच्या सुप्त अवस्था असतात.

रोटोवेटर ऐवजी चुरा करणारे यंत्र श्रेडरच्या सहाय्याने प-हाटीचा बारीक चुरा करुन कंपोष्ट खतासाठी उपयोग करता येऊ शकतो. जिनींग मिल व कापूस साठविलेल्या ठिकाणी कामगंध सापळयाचा वापर करावा. त्यामुळे बोंडअळीचे पतंग या सापळ्यामध्ये पकडले जातील. अशाप्रकारे खबरदारी घेतल्यास आणि फरदड घेणे टाळल्यास पुढील हंगामात येणारा बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com