Fardad Kapashi : तुम्हीही फरदड कपाशी घेताय का?

Team Agrowon

मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ४ ते ५ टक्के च्या दरम्यान दिसून आला.

Fardad Kapashi | Agrowon

पुढील काळातही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण बरेचशे शेतकरी कपाशीची फरदड घेत आहेत.

Fardad Kapashi | Agrowon

फरदड पध्दतीमुळे शेतीमध्ये दीर्घकाळ पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतं.

Fardad Kapashi | Agrowon

फरदड पिकामध्ये जोमदार उत्पादन मिळण्यासाठी पाणी, खतं, कीटकनाशकं यांचा वापर केला जातो. या पध्दतीमुळे कापूस पीक शेतामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतरही राहते.

Fardad Kapashi | Agrowon

गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेता तिचं शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये. 

Fardad Kapashi | Agrowon

फरदड पीक घेण्याची पध्दत शेतकऱ्यांना फायदयाची वाटते.

Fardad Kapashi | Agrowon
cta image | Agrowon
Click Here