Pune News : पुणे शहरातील वर्दळीचे रस्ते तसेच पालिकेच्या सेवा क्षेत्रांच्या जागांवर अनधिकृतपणे भरविले जाणारे आठवडे बाजार बंद केले जाणार आहेत. महापालिकाच आता शहरातील ४२ प्रभागांमध्ये प्रत्येकी २ आठवडा बाजार सुरू करणार आहे.
त्यासाठीची नियमावली तसेच जागांची निश्चिती पालिकेकडून करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. आठवडा बाजारात केवळ शेतकऱ्यांनाच माल विक्रीची मुभा राहणार आहे. आठवडा बाजार भरविणारे शेतकरी संघ, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी गटांना यात प्राधान्य दिले जाणार आहे.
शहरात सध्या मोठ्या प्रमाणात स्थानिक भाजी विक्रेत्यांना जागा देऊन पैसे कमाविण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून अनधिकृतपणे आठवडा बाजार भरविले जात आहेत. दिलेल्या जागांचे शुल्क म्हणून पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत बाजारांना आळा घालण्यासाठी नियमावली करण्याचे काम हाती घेतले आहे.
प्रत्येक प्रभागात दोन आठवडा बाजार :
शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून आठवडा बाजार सुरू करण्यासाठी कृषी विभागाकडे मागणी केली जाते. कृषी विभागाच्या शिफारशीनंतर संबंधित शेतकरी
कंपन्यांकडून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे, अतिक्रमण विभागाकडे जागा उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज केला जातो. याबाबतचे ५७ अर्ज आतापर्यंत
महापालिकेने मंजूर केले आहेत. त्यासाठी मालमत्ता विभागाकडून जागा निश्चित करून दिली जात असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. त्यानुसार महापालिका
शहरात प्रत्येक प्रभागात २ या प्रमाणे ७५ ठिकाणी बाजार भरविण्यास परवानगी देणार आहे.
असे आहे बाजारांचे नियोजन :
- शहरात ७५ ठिकाणे निश्चित करणार
- प्रती स्टॉल १०० रुपये अनामत शुल्क
- प्रती स्टॉल ५० रुपये शुल्क
- एका बाजारात ३० ते ४० स्टॉल
- नोंदणीकृत शेतकऱ्यांना भाजी विक्रीची परवानगी
- अनधिकृत विक्रेत्यांवर होणार कारवाई
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.