Market Facilities Farmers : शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा द्या

Mango Market : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा संचालकांनी उपलब्ध करुन द्याव्या, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी (ता. २३) केले.
Market Facilities Farmers
Market Facilities Farmersagrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : सहकारी संस्था या सगळ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या असाव्या. त्यासाठी आपापसांतले मतभेद बाजूला ठेवावे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा संचालकांनी उपलब्ध करुन द्याव्या, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी (ता. २३) केले.

छत्रपती संभाजीनगर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आंबा मिलेट महोत्सव २०२५ चे उद्घाटन राज्यपाल हरिभाऊ बागडे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बागडे बोलत होते. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण यांचीही यावेळी उपस्थिती होती. हा महोत्सव पाच दिवस सुरु राहणार आहे.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले, की एकदा चांगल्या कामाला सुरुवात केली कि लोकांचा विश्वास प्राप्त होतो.बाजार समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या शेतकरी हिताच्या सर्व उपक्रमात आपला सहयोग असेल, असे आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचे लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Market Facilities Farmers
Chhatrapati Sambhaji Maharaj Birth Anniversary: स्वराज्याचे शूर रक्षक छत्रपती संभाजी महाराज; चला जाणून घेऊया त्यांचे शौर्य!

बाजार समितीच्या आवारात आयोजित या महोत्सवात आंबा उत्पादक शेतकरी, धान्य उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत आदींनी आपले स्टॉल्स लावले होते. बाजार समितीचे सभापती डॉ. राधाकिसन पठाडे, रामुकाका शेळके, भगवान मुळे, मुरलीधर चौधरी, व्यवस्थापक नितीन पाटील, सह. निबंधक शरद जरे, एच. पी. कंपनीचे अजय सिन्हा आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com