Weed Management : सलग अन् आंतरपीक पद्धतीत तण व्यवस्थापन

Intercropping System : सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीचा ४५ दिवसांचा कालावधी पीक आणि तणांमध्ये स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनशील असतो. पीक वाढीच्या सुरुवातीच्या संवेदनशील काळात तण व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात घट येते. त्यासाठी पीक तणविरहित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
Weed Management
Weed ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. विकास गौड, डॉ. आदिनाथ पासलवार

Indian Agriculture : राज्यात सोयाबीनची दरवर्षी सुमारे ५० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीचा ४५ दिवसांचा कालावधी पीक आणि तणांमध्ये स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनशील असतो. या कालावधीत तण व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. संवेदनशील कालावधीनंतर तण व्यवस्थापन केले, तरी उत्पादनात झालेली घट भरून काढणे शक्य होत नाही.

त्यासाठी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तण व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. तणांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकांमध्ये कमी उत्पादन होण्यासह गुणवत्ता कमी होणे, काढणीदरम्यान अडचण येतात. याशिवाय विविध तणे कीड आणि रोगांना यजमान वनस्पती म्हणून कार्य करतात. परिणामी, उत्पादन खर्चात वाढ होते. त्यासाठी तण व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

जमिनीची मशागत, जांभूळवाही, प्रमाणित बियाण्यांचा वापर, योग्य वाण निवड, योग्य अंतरावर आणि वेळेवर लागवड, पिकांची फेरपालट, संतुलित खत व्यवस्थापन आणि निंदणी या बाबींचे काटेकोर पालन केल्यास कमी खर्चात प्रभावी तण व्यवस्थापन शक्य होते. आवश्यकतेनुसार शिफारशीप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे.

Weed Management
Weed Management : तण काढणीची अवजारे, यंत्रे

सलग सोयाबीन

तणनाशक प्रति एकर मात्रा वापर

उगवणपूर्व

पेंडीमिथॅलीन (३८.७ टक्के सीएस) ७०० मिलि उगवणपूर्व, गवतवर्गीय आणि रुंद पानी तणांच्या व्यवस्थापनासाठी.

डायक्लोसुलम (८४ टक्के डब्ल्यू.डी.जी) १२.४ ग्रॅम उगवणपूर्व, लव्हाळा, केणा, दुधी, जंगली धान, दीपमाळ, कुंजर, माठ, गाजर गवत इ. तणांसाठी.

उगवणपश्चात

१) इमॅझिथापर (१० टक्के एसएल) ३०० ते ४०० मिलि उगवणपश्चात (पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी), प्रसारक द्राव्य ३०० मिलि अधिक १५० लिटर पाणी प्रति एकर प्रमाणे मिसळून फवारणी करावी. लव्हाळा केणा, विंचू, दुधी इत्यादी तणांसाठी.

२) क्लोरिमुरॉन इथाईल (२५ टक्के डब्लूपी) १५ ग्रॅम उगवणपश्चात (पेरणीनंतर १५ दिवसांनी), प्रसारक द्राव्य २५० मिलि अधिक १२० लिटर पाणी प्रति एकर प्रमाणे मिसळून फवारणी करावी. लव्हाळा, केणा, कोंबडा, हजारदाणी, कुंजर, गाजरगवत व दीपमाळ इत्यादी रुंद पानी तणांसाठी.

३) क्विझॅलोफॉप- पी-इथाईल (५ टक्के ईसी) ४०० मिलि उगवणपश्चात (पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी), गवतवर्गीय तणांसाठी.

४) प्रोपाक्विझॅफॉप (१० टक्के ईसी) ३०० मिलि उगवणपश्‍चात (पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी), गवतवर्गीय तणांसाठी.

५) इमॅझिथापर अधिक इमॅझिमॉक्स

(७० टक्के डब्ल्यूजी) ४० ग्रॅम उगवणपश्च्यात (पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी किंवा तण २ ते ४ पानांच्या अवस्थेत असताना). द्रावणात प्रसारक द्रव्ये ३०० मिलि अधिक १५० लिटर पाणी प्रति एकर प्रमाणे मिसळून फवारणी करावी. केणा, दुधी, फुगा, कुंजर, जंगली धान, लोनीगवत, वाघनखी आणि शिंपी इत्यादी तणांसाठी.

६) प्रोपाक्विझॅफॉप (२.५ टक्के) अधिक इमॅझिथापर (३.७५ टक्के एमई) ८०० मिलि उगवणपश्च्यात (तणांच्या २ ते ४ पानांच्या अवस्थेत किंवा पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी). केणा, दुधी, कुंजर, माठ, वाघनखी, जंगली धान आणि नाचणी इत्यादी तणांसाठी.

७) फोमेसाफेन (११.१ टक्के) अधिक फ्लुआझीफॉप-पी-ब्युटील (११.१ टक्के एसएल) (संयुक्त तणनाशक) ४०० मिलि उगवणपश्च्यात (तणांच्या २ ते ४ पानांच्या अवस्थेत किंवा पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी). केणा, दीपमाळ, हजारदाणी, कुंजर, जंगली धान, नाचणी, वाघनखी, लोनीगवत, आणि शिंपी इत्यादी तणांसाठी.

Weed Management
Intercropping Method : आंतरपिकांना बहर

आंतरपीक पद्धती

पीक पद्धत तणनाशक प्रति एकर मात्रा वापर

१) कापूस अधिक सोयाबीन किंवा भुईमूग पेंडीमिथॅलिन (३८.७ टक्के सीएस) ७०० मिलि उगवणपूर्व, गवतवर्गीय आणि रुंद पानी तणांच्या व्यवस्थापनासाठी.

२) कापूस अधिक तूर किंवा सोयाबीन पेंडीमिथॅलिन (३० टक्के ईसी) १३०० मिलि

३) कापूस अधिक उडीद किंवा सोयाबीन किंवा भुईमूग क्विझॅलोफॉप-पी-ईथाइल

(५ टक्के ईसी) ४०० मिलि उगवणपश्च्यात (पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी) गवतवर्गीय तणांसाठी.

४) तूर अधिक सोयाबीन

पेंडीमिथॅलिन (३० टक्के ईसी) १३०० मिलि उगवणपूर्व, गवतवर्गीय आणि रुंद पानी तणांसाठी.

इमॅझिथापर (१० टक्के एसएल) ४०० मिलि उगवणपश्च्यात (पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी) प्रसारक द्राव्य मिसळून घ्यावे. केणा, दुधी आणि जंगली धान इत्यादी तणांच्या व्यवस्थापनासाठी.

५) तूर अधिक मूग किंवा उडीद इमॅझिथापर (१० टक्के एसएल) ३०० मिलि उगवणपश्च्यात (पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी)

६) तूर अधिक सोयाबीन किंवा भुईमूग इमॅझिथापर (३५ टक्के) अधिक इमॅझीमॉक्स (३५ टक्के डब्ल्यूजी) ४० ग्रॅम उगवणपश्च्यात (पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी) किंवा तण २ ते ३ पानांच्या अवस्थेत असताना प्रसारक द्रव्ये मिसळून फवारणी करावी. केणा, दुधी आणि जंगली धान इत्यादी तणांसाठी.

तणनाशक फवारणीवेळी घ्यावयाची काळजी

तणनाशक सोबतच्या लेबलवरील माहिती नीट वाचून घ्यावी.

तणनाशकाची फवारणी शिफारशीत मात्रेत आणि वेळेनुसार करावी.

उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी चांगली मशागत केलेल्या ढेकळेरहित व सपाट जमिनीवर पुरेसा ओलावा असताना करावी.

उगवणपश्‍चात तणनाशकाची ढगाळ, पावसाळी वातावरण, धुके किंवा पाऊस असताना तसेच कडक उन्हात फवारणी करणे टाळावे.

फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे

सतत एकाच तणनाशकाचा वापर टाळावा.

तणनाशक फवारणीसाठी स्वतंत्र पंप ठेवावा.

फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे.

तणनाशक वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

तणनाशक फवारणी करताना फवारा शेजारच्या शेतातील इतर पिकांवर उडणार नाही याची दक्षता घ्यावी.

डॉ. विकास गौड, ८६३७७०७६४५

(कृषिविद्यावेत्ता, तण व्यवस्थापन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com