Water crisis
Water crisis Agrowon

Water Crisis : ४८ गावांचा पाणीप्रश्न निकाली काढू

Water Issue : ‘वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या टप्पा क्र. १ व २ बाबत संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलावून शिराळा व वाळवा तालुक्यांतील ४८ गावांचा पाणीप्रश्न निकाली काढू.

Sangli News : ‘वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या टप्पा क्र. १ व २ बाबत संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलावून शिराळा व वाळवा तालुक्यांतील ४८ गावांचा पाणीप्रश्न निकाली काढू. हे आपले सरकार आहे. इथे आधी काम असते. निधी किरकोळ मागू नका, भरघोस मागा,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. २८) दिली.

कामेरी (ता. वाळवा) येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. आमदार विनय कोरे, शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, सत्यजित देशमुख, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, दि. बा. पाटील यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘शिराळा मतदार संघात शेतीच्या पाण्याचा प्रश्न वा अन्य कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. ते म्हणायचे, की शब्द देतानाच विचार करा आणि एकदा दिला की तो पूर्ण करा.

Water crisis
Water Crisis : खारेपाटमध्ये पाणीटंचाई

तेव्हा दोन्ही तालुक्यातील ४८ गावांना निधी कमी पडणार नाही. मराठ्यांना १० टक्के आरक्षण दिले. ते टिकणारे आहे. टिकणार नाही, असे टीकाकार म्हणतात. कारणे द्यावीत. मी सांगतो कसे टिकेल ते.’

Water crisis
Water Crisis : अक्कलकोट तालुक्यातील ४९ गावे टंचाईग्रस्त

ते म्हणाले, ‘फिर एक बार-मोदी सरकार’साठी धैर्यशील मानेंना विजयी करा. मुस्लिम समजाला घाबरवून मतांसाठी वापरून फेकून देणारे सरकार आमचे नाही. मौलना आझाद महामंडळाला ५०० कोटी रुपये दिलेत.

मानेंनी प्रत्येक गावात दिलेल्या निधीचे पुस्तक काढले आहे. त्यातील एक आकडा खोटा असेल तर कान धरा.’ माने म्हणाले, ‘पुढील पाच वर्षांत प्रत्येक गावात विकासपर्व दिसेल.’ सदाभाऊ खोत, पाटील, जयराज पाटील यांचेही भाषण झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com