Farmer Protest: मंत्रालयात घुसून आंदोलन करू: बच्चू कडू

Bachhu Kadu: सरकारने तत्काळ निर्णय न घेतल्यास यापुढे वेळ काळ न सांगता शेळ्या मेंढ्यांसह मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला.
Bacchu Kadu
Bacchu KaduAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, दिव्यांगांच्या मानधनात सहा रुपयांची वाढ करावी यासह इतर विविध मागण्यांबाबत राज्य सरकारने तत्काळ निर्णय न घेतल्यास यापुढे वेळ काळ न सांगता शेळ्या मेंढ्यांसह मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात गुरुवारी (ता. २४) दुपारी चार वाजेच्या सुमारास ‘प्रहार’च्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी श्री. कडू बोलत होते. आंदोलनस्थळी ‘एमआयएम’चे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला. त्याच वेळी ‘मनसे’चे नेते प्रकाश महाजन यांनी आंदोलनस्थळी येत चंदन लावून श्री. कडू यांचे पाय धुतले.

Bacchu Kadu
Farmer Protest: चक्‍का जाम आंदोलनातून शेतकऱ्यांची ताकद दिसेल

दरम्यान जालना, बीड, अहिल्यानगर, अकोला, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, नाशिक, नांदेड आदी जिल्ह्यांसह राज्यभरात प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

Bacchu Kadu
Farmers Protest : शेतकरीप्रश्‍नी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन

श्री. कडू म्हणाले, की शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, मेंढपाळ यांच्यासाठी हे आंदोलन आहे. दूध उत्पादक, शेतकरी, शेतमजूर कोणीच सुखी नाही. अशा स्थितीत कृषिमंत्र्यांनी पैसे कमविण्यासाठी रमी खेळण्याचा पर्याय दिला. कृषिमंत्री विधान भवनात रमी खेळतात ही दुर्दैवी गोष्ट आहे. ९००० कोटींचा कर राज्याला रमी खेळातून मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी वतनदारी संपुष्टात आणली. सरकारने मात्र रमी स्वीकारली, याला रामाचं राज्य म्हणावे की रावणाचे, असा सवाल श्री. कडू यांनी उपस्थित केला.

शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्‍नांची लढाई बच्चू कडू लढत आहेत. या लढाईसाठी आमचा पाठिंबा आहे. शासनाने घोषणा करण्यापलीकडे काही केलेले नाही. यापुढे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्‍नांवर न्यायाची भूमिका न घेतल्यास आम्हीपण रस्त्यावर उतरून लढाई करू.
इम्तियाज जलील, माजी खासदार, एमआयएम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com