
Buldana News : केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय विभागाच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यातील आठ गावांची निवड झालेली आहे.
लोकसहभाग वाढवण्यासाठी तसेच युवा पिढीला पाणलोट क्षेत्र विकासाचे महत्त्व लक्षात येण्यासाठी केंद्र सरकारकडून वॉटरशेड यात्रा काढण्यात आली. या यात्रेनिमित्त गुरुवारी (ता. २०) डिग्रस बुद्रुक गावात कार्यक्रम झाला.
योजनेअंतर्गत देऊळगावराजा तालुक्यातील आठ गावांमध्ये मृद् आणि जलसंधारणाचे उपचार राबविण्यात येत आहेत. लोकांचा या योजनेला सक्रिय सहभाग मिळविण्यासाठी, लोकसहभाग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवड केलेल्या डिग्रस बुद्रुक या गावात उपक्रमांतर्गत ग्रामसभा, समिती सभा तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पाणलोट क्षेत्र विकास विषयावर निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेतली.
त्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र दिले. पाणलोट कामांना चांगल्या प्रकारे राबविणाऱ्या दोन जणांना एक पाणलोट योद्धा एका महिलेला धरिणीताई पुरस्कार तसेच, प्रगतिशील शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हाताने गौरविण्यात आले.
गुरुवारी सकाळी वॉटरशेड यात्रेची मोबाइल व्हॅन गावात आली असता त्या ठिकाणी विविध विभागांच्या अधिकारी आणि गावातील मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पूजन केले. या योजनेतून घेतलेल्या फळबाग लागवडीची पाहणी केली, ढाळीची बांधबंदिस्तीच्या कामाचे लोकार्पण केले.
तसेच यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. डिग्रस बुद्रुक येथील कार्यक्रमाला समाधान वाघ (प्रकल्प कार्यन्वयीन यंत्रणा तथा मंडळ कृषी अधिकारी देऊळगाव मही), मृद् व जलसंधारण उपविभागीय अभियंता विलास लाकडे, जलसंधारण अधिकारी वैभव शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद शिंगाडे, उपविभागीय अभिंयता देविदास केंधळे, अविनाश भोयर, श्रद्धा मानकर, विकास दळवी हे उपस्थित होते.
कृषी सहायक घनश्याम डोईफोडे यांनी सूत्र संचालन केले, कृषी पर्यवेक्षक विनायक मेहेत्रे, अमोल पाटील, योगेश चेके, विकास घुसळकर, शिवाजी शिंगणे, दिलीप शिंगणे, उदय डोईफोडे,सुभाष मगर, विशाल पवार, पाणलोट समिती अध्यक्ष, सचिव यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.