Rural Water Management : लोकसहभागातून जल-मृद्‌संधारणाला गती

Soil-Water Conservation : पाणी ही सर्वांना लागणारी बाब आहे, सर्वांसाठी अत्यावश्यक आहे. पाणी असेल तर स्थिरता आहे, पाणी नसेल तर स्थलांतर अटळ.
Water Conservation
Water Conservation Agrowon
Published on
Updated on

Water Conservation : पाणी ही सर्वांना लागणारी बाब आहे, सर्वांसाठी अत्यावश्यक आहे. पाणी असेल तर स्थिरता आहे, पाणी नसेल तर स्थलांतर अटळ. त्यामुळे पाण्याचे काम करत असताना कोणतीही बाब असो, नवीन तलाव बांधणे, गाळ काढणे, ओढ्या नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण किंवा सामुदायिक नदीच्या कामामध्ये लोकसहभाग अपरिहार्य आहे. अन्यथा हे काम एकसुरी आणि अनुपयोगी ठरण्याची दाट शक्यता असते. 

केंदूरने केली दुष्काळावर मात

केंदूर (ता.शिरूर,जि.पुणे) येथे २०१८ सालच्या तीव्र आणि भीषण दुष्काळानंतर गावातील तरुण युवक युवती एकत्र आले आणि पाण्यावर काम करण्याची त्यांनी निश्चित केली. गावातील आयकर विभागामध्ये उच्च पदावर कार्यरत असणारे युवा अधिकारी प्रशांत गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावतील टीमची बांधणी झाली.

काम करण्याच्या आधी तीन महिने गाव शिवाराचा जलस्रोतांचा पाणलोटाचा केवळ अभ्यास ही टीम करत होती. यामध्ये पाण्याचा ताळेबंद काढणे, शिवार फेरी, जलस्रोत आणि शेतकऱ्यांची माहिती एकत्र करणे, त्यांचे जलस्रोतांचे अक्षांश रेखांशासह छायाचित्र काढणे तसेच परिसराची शूटिंग या सर्व बाबी लोकसहभागातूनच झाल्या आहे.

सुमारे तीन महिन्याच्या अभ्यासानंतर सर्व गोष्टी केंद्राई मंदिरामध्ये मांडण्यात आल्या. त्याचप्रमाणे प्रत्येक वाडी वस्तीवर देखील याचे प्रात्यक्षिक आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून सर्व ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. यामुळे करत असलेले काम अथवा प्रस्तावित असलेले काम हे माझ्यासाठी आहे, असा प्रत्येकाचा भाव तयार झाला.

त्यानंतर संपूर्ण काम होईपर्यंत लोकसहभागातून सुमारे २५ लाख रुपये रक्कम जमा झाली. काही सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून रक्कम प्राप्त झाल्यानंतर सुमारे दोन वर्षात हे काम पूर्ण झाले. त्यानंतर २०१८ सालच्या तीव्र दुष्काळाप्रमाणे अजून दुष्काळ पडलेला नाही. 

जमीन केली क्षारमुक्त

तांदळी आणि गणेगाव दुमाला (ता. शिरूर, जि.पुणे) तसेच रांजणगाव सांडस,रांकशेवाडी या ग्रामपंचायती अंतर्गत सुमारे १४०० एकर जमीन अति सिंचनामुळे क्षारपड झाल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. मागील सुमारे ३० वर्षांच्या कालावधीमध्ये क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढतच गेले आणि त्यांची उपयुक्तता शून्यावर आली.

हा प्रश्न समोर आल्यानंतर तांदली येथील तत्कालीन पंचायत समिती सदस्य पोपट गदादे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रांजणगाव सांडस येथील अजित शितोळे आणि सदाशिव दिवेकर यांनी गावातील तरुणांचा गट तयार करण्यात आला. या गटाने प्रत्येक घरोघरी फिरून शासकीय दस्तऐवज एकत्र करून क्षारपड जमिनीची तीव्रता आणि झालेल्या आर्थिक नुकसानीचा ताळेबंद गावासमोर मांडला. शेतकरी निहाय माहिती गोळा केली.  

Water Conservation
Watershed Management: संसाधने अन् जैवविविधता संवर्धनावर भर हवा

उपग्रहावरून प्राप्त होणाऱ्या नकाशाचा वापर करून ड्रोन शूटिंग करण्यात आले. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर ग्रामसभा घेऊन प्रत्येक वाडी, वस्तीवर प्रात्यक्षिक आणि सविस्तर माहिती सांगण्यात आली. त्यानंतर अत्यंत गुणवत्तापूर्ण काम झाले. जवळपास ८० ते ९० टक्के जमीन आज पूर्ण क्षमतेने लागवडीखाली आली आहे. गाव छोटे असो किंवा मोठे, गावाच्या समस्यांचे आकलन, त्यांची उकल आणि लोकसहभाग या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत.

 समाज माध्यमांचा वापर

गावातील लोकांनी शहरांमध्ये तसेच परदेशात राहणाऱ्या गावकऱ्यांची यादी तयार केली. त्याची ग्रामविकासात मदत घेण्यात आली. यासाठी गुगल मीट, झूम यासारख्या व्यासपीठाचा उपयोग करण्यात आला. लोकांना कामकाजाची माहिती देण्यात आली.

व्हाट्सअप ग्रुप तयार करून सर्वांना माहिती पोहोचविण्यात आली. त्यामुळे कामाच्या प्रति विश्वास वाढला. गावाच्या विकासाचे काम हे शाश्वत असणारे काम आहे, ही बाब गावकऱ्यांच्या मनामध्ये दृढ झाली. त्यामुळे साहजिकच लोकसहभाग मिळाला. यामध्ये काही ठिकाणी आर्थिक भारही लोकांनी सहन केला.  

Water Conservation
Watershed Development : पाणलोट क्षेत्र विकासातील महत्त्वाचे उपचार

साधले पूर नियंत्रण

कोंडगाव-साखरपा (जि.रत्नागिरी) येथील काजळी नदीला येणारा पूर गावकऱ्यांनी लोकसहभागातून थांबवला. यासाठी दत्त देवस्थान ट्रस्ट, साखरपा यांच्या विश्वस्तांनी निधी उभा केला. गावातील प्रत्येक व्यक्तीकडून यथाशक्ती देणगी घेतली. त्याचप्रमाणे गावातील तसेच परगावातील प्रत्येक नागरिकांच्या परिचितांमध्ये या बाबींचे माहितीचे प्रसारण करण्यात आले. सुमारे ३२ लाख रुपये लोकसहभाग उभा करून नाम फाउंडेशने दिलेल्या यंत्रांच्या माध्यमातून २०२१ साली काजळी नदीवर काम करण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत नदीला महापूर आला नाही.

थांबले स्थलांतर

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये बंजारा समाज राहत असलेल्या पाचेगाव आणि जयराम नाईक तांडा या गावांमध्ये जलसंधारणाचे काम लोकसहभागातून करण्यात आले. प्रत्येक वाडी, वस्तीवरील कुटुंबापर्यंत ही माहिती देण्यात आली. लोकांची बैठक तसेच नभांगण फाउंडेशन आणि इंडिविस वेलफेअर फाउंडेशन अशा संस्थांनी आर्थिक सहकार्य देण्याचे कबूल केले. त्यांच्या माध्यमातून किमान ५० टक्के स्थलांतर यावर्षी थांबणार आहे.

९७६४००६६८३,

(माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com