Khandesh Water Stock : खानदेशात जलसाठा स्थिर

Water Crisis : खानदेशात नुकताच सर्वत्र पाऊस झाला. परंतु यामुळे सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात फारशी किंवा मोठी वाढ झालेली नाही.
Water Stock
Water StockAgrowon

Jalgaon News : खानदेशात नुकताच सर्वत्र पाऊस झाला. परंतु यामुळे सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात फारशी किंवा मोठी वाढ झालेली नाही. जलसाठा स्थिर असून, ओलावा असल्याने पिकांच्या सिंचनाची कार्यवाही बंद आहे. यामुळे भूगर्भातील पाणीउपसा बंदावस्थेत आहे.

सध्या कूपनलिका, विहिरी व इतर कृत्रिम जलसाठ्यांमधून पिकांच्या सिंचनाची कार्यवाही अपवाद वगळता सुरू नाही. अर्थात, पावसामुळे पाण्याची बचत झाली आहे. परंतु सतत जोरदार किंवा अतिजोरदार पाऊस नसल्याने सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झालेली नाही. खानदेशातील एकूण जलसाठ्यात मध्यंतरी किंवा ऑक्टोबरमध्ये घट दिसून आली. ही घट झपाट्याने सुरू होती. कारण ऑक्टोबरमध्ये पाऊस नव्हता.

Water Stock
Drought Crisis : भीषण दुष्काळाची चाहूल

परतीचा पाऊस नसल्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच सिंचनाचे काम सुरू झाले. यामुळे कूपनलिका, विहिरी व इतर कृत्रिम जलसाठ्यांमधून पाण्याचा उपसा वेगात सुरू होता. तापी नदीवरील हतनूर, वाघूर नदीवरील वाघूर प्रकल्पातून जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. तसेच गिरणा नदीवरील गिरणा धरणातून देखील नदीत टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्यात आले.

परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतीसंबंधीच्या पाण्याची बचत झाल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. ज्वारी, मका, केळी, भाजीपाला, फळ पिकांना पुढील काही दिवस सिंचनाची गरज नाही. कारण सर्वत्र २० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

नंदुरबारात २५ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. तेथे लहान नाल्यांना चांगले प्रवाही पाणी आले. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, धुळ्यातील साक्री भागातही चांगला पाऊस झाला आहे. तसेच इतर भागांतही बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पिकांच्या सिंचनाची गरज नाही. स असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Water Stock
Drought Condition : ‘दुष्काळसदृश’मधून कोरडवाहू कोरडगावच वगळले

जलसाठ्याला आधार

खानदेशात यंदा पाऊसमान कमी राहिल्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीला एकूण जलसाठा सुमारे ५३ टक्के एवढा होता. त्यात सतत घट झाली. नोव्हेंबरच्या मध्यात हा जलसाठा सुमारे ४८ टक्के एवढा होता. परंतु हा जलसाठा आता स्थिर आहे. नंदुरबारात काही तलावांत जलसाठा किंचित वाढला आहे.

परंतु यामुळे एकूण जलसाठ्यात मोठी वाढ झालेली नसल्याची माहिती मिळाली. सध्या गिरणा धरणात सुमारे ५१ टक्के जलसाठा आहे. तर वाघूर धरणातील जलसाठा ९० टक्के एवढा आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यात रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील गारबर्डी, मोर, चोपड्यातील गूळ, जामनेरातील तोंडापूर, वाघूर, धुळ्यातील अनेर, पांझरा, नंदुरबारातील दरा व देहली या प्रकल्पांत ९० टक्के जलसाठा होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com