Water Scarcity : वारणा धरणातील पाणीसाठ्यात चार महिन्यांत ९ टीएमसीने घट

Water Shortage : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले तरी धरणात पाणीसाठा पुरेसा होता.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Sangli News : शिराळा तालुक्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिल्यानंतर ३ ऑक्टोबरला दरवाजे बंद केले होते. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले तरी धरणात पाणीसाठा पुरेसा होता. मात्र, धरणातून वीजनिर्मिती केंद्र तसेच कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने गेल्या चार महिन्यांत ८.९१ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गत वर्षीपेक्षा हा साठा ३ टीएमसीने कमी आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे.

सध्या फक्त वीजनिर्मिती केंद्रातून १५०३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये कॅनॉलमध्ये ३५०, तर नदीत १२४० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणात आता फक्त १८.२१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Crisis
Ujani Water Crisis : उजनीतून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ थांबवा

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी दिली होती. यामुळे १ ऑक्टोबरला चारही वक्राकार दरवाजे उघडले होते. पावसाने उघडीप दिल्याने ३ ऑक्टोबरला हे दरवाजे बंद करण्यात आले होते. यानंतर फक्त वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता. मात्र त्यानंतर पाण्याची आवक पूर्ण थांबल्याने वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आले होते.

Water Crisis
Water Crisis : कांदापीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

गेल्या चार महिन्यांत ८.९१ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. या वर्षी या धरण परिसरात आज अखेर १८८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या धरणाची ३३.४० टीएमसी क्षमता असून, २५.४९ टीएमसी (७४.१० टक्के) तसेच उपयुक्त साठा १८.४८ टीएमसी (६७.६२ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी हा साठा २१.४३ टीएमसी होता म्हणजे या वर्षी २.९५ टीएमसी साठा कमी आहे.

धरणातील पाण्याची सद्य:स्थिती

एकूण पाणीसाठा क्षमता ३४.४० टीएमसी

धरण पातळी ६१६.६० मीटर

धरण पाणी साठा २५.२३ टीएमसी (७३.३३ टक्के)

उपयुक्त पाणीसाठा १८.३५ टीएमसी (६६.६६ टक्के)

एकूण पाऊस १८८९ मिलिमीटर

टीएमसी ( ७४.१० टक्के)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com