Hippargi Almatti Dam : 'हिप्परगी-अलमट्टी धरणातील पाणीसाठा क्षमतेपेक्षा कमी ठेवावा', कृष्णा महापूर नियंत्रण समिती

Almatti Dam Water : हिप्परगी व अलमट्टी धरणातील पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त ठेवल्यास कोल्हापूर, सांगली महापुराचा फटका बसतो.
Hippargi Almatti Dam
Hippargi Almatti Damagrowon
Published on
Updated on

Kolhapur Flood Control Committee : मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात एका दिवसाच्या पावसाने ५५ बंधारे पाण्याखाली गेले होते तर राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३३ फुटांवर गेली होती. याला कारणीभूत अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील पाणी न सोडल्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कृष्णा महापूर नियंत्रण समितीने हिप्परगी येथे जाऊन जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे.

गेल्या आठवड्यात हिप्परगी व अलमट्टी धरणातील ५२१.६० मीटर पाणी पातळी होती. त्यामुळे कोल्हापूरची पंचगंगा व सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची फूग वाढली होती. याबाबत कृष्णा महापूर नियंत्रण समितीने हिप्परगी येथे जाऊन जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला त्यानंतर हिप्परगीचा विसर्ग वाढवल्यानंतर ७२ तासांनी म्हणजे बुधवारी कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी दीड फुटाने कमी झाली.

केंद्रीय जलआयोगाच्या शिफारशीप्रमाणे विसर्ग ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर पाठपुरावा व्हावा, अशी अपेक्षा कृष्णा महापूर नियंत्रण समिती व धरण अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी व्यक्त केली.

हिप्परगरी व अलमट्टी धरणातील पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त ठेवल्यास कोल्हापूर, सांगली महापुराचा फटका बसतो. यंदाही ९ जुलैला हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद असल्याने पाण्याची फूग कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्यापर्यंत वाढली होती. कृष्‍णा महापूर नियंत्रण समितीच्या कार्यकर्त्यांनी हिप्परगी येथे जाऊन अभियंत्याशी चर्चा केली.

Hippargi Almatti Dam
Agricultural Research Centre Kolhapur : पोहे, चिरमुऱ्यासाठी भाताचे नवे वाण, राधानगरी कृषी संशोधन केंद्राकडून विकसित

कोल्हापूर- सांगलीतील पाण्याची फूग वाढल्याचे दाखवून दिल्यानंतर विसर्ग वाढवला. त्यानंतर जमखंडी, अथणी ते राजापूर येथील पाणी पुढे सरकू लागले तसे कोल्हापुरातील पाण्याची फूग ७२ तासांनी राजाराम बंधारा तसेच राजापूर, नृसिंहवाडी येथील पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली.

३१ ऑगस्टपर्यंत आलमट्टीची पातळी ५१७ मीटरपेक्षा कमीच ठेवण्याची गरज

कोल्हापुरातून राधानगरी धरणाचा पाण्याचा विसर्ग केंद्रीय जल आयोगाच्या शिफारशीनुसार संतुलित ठेवण्याची जलसंपदा विभागाने चांगली अंमलबजावणी केली. त्यामुळे तूर्त गंभीर स्थिती ओढावलेली नाही. यापुढेही सातत्य ठेवल्यास पाऊस वाढला तरी महापुराची चिंता बाळगण्याची कारण नाही, मात्र त्यासाठी हिप्परगी व आलमट्टीची पाणी पातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरपेक्षा कमी ठेवणेच गरजेचे असल्याचे दिवाण यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com