Water Storage : राज्यात धरणांतील पाणीसाठा तळाला

Water Shortage : राज्यात यंदा पावसाने दिलेली हुलकावणी आणि कडक उन्हाळ्यामुळे धरणांमध्ये केवळ ३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Mumbai News : राज्यात यंदा पावसाने दिलेली हुलकावणी आणि कडक उन्हाळ्यामुळे धरणांमध्ये केवळ ३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी पाणीसाठा घटल्याने संभाव्य टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे १५. ७४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून त्यापाठोपाठ पुणे, नाशिक आणि कोकणात पाण्याचा साठा तळाला गेला आहे.

धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असताना उन्हाळा कडक होत चालला आहे. त्यामुळे उसासह उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. उन्हाळी भात, भुईमूग, मक्यासह अन्य पिके धोक्यात आली असून बळीराजा वळीव पावसावर अवलंबून आहे.

पाऊसकाळात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने राज्यातील धरणांत पुरेसा साठा झाला नाही. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमधील तापमान ३५ चे ४० अंश डिग्री सेल्सिअसच्या जवळपास गेल्याने कडक उन्हाळा आहे. परिणामी, राज्यात वीज आणि पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

Water Shortage
Water Shortage : मराठवाड्यात उपयुक्त पाणीसाठा १८ टक्क्यांवर

तसेच कडक उन्हाळ्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. परिणामी धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. सध्या नागपूर विभागातील मोठे, लहान आणि मध्यम प्रकल्पांत ४२. ९८ टक्के पाणीसाठा असून हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला आहे. गेल्या वर्षी तो ४० टक्के होता.

अमरावती विभागातील पाणीसाठा ४५. ५२ टक्क्यांवर आला असून मागील वर्षी तो ६७. ८९ टक्के होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक कमी पाणीसाठा असून येथे ६०० हून अधिक टँकरने पाणी पाणीपुरवठा केला जात आहे.

जायकवाडी धरणात केवळ १२. ९४ टक्के पाणी आहे. आपेगाव उध्वस्तर बंधाऱ्यात ३४. ५७ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी २० एप्रिल रोजी तो ४२. ६१ टक्के होता. नाशिकमध्ये ३३. ५३ टक्के पाणीसाठा आहे. भावलर प्रकल्पात १२. ५०, भाम धरणात १७. २६, चकणापूर प्रकल्पात २. ९८ टक्के, वाघाड प्रकल्पात ७. ६६ टक्के पाणी आहे.

Water Shortage
Kolhapur Water Shortage : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्याला पाणी टंचाईची शक्यता

पुणे विभागात केवळ २८ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी हा साठा ३६ टक्के होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा प्रकल्पात सर्वात कमी म्हणजे २६. ८५, राधानगरी धरणात ३४. ७७ टक्के, तुळशी प्रकल्पात ५३ टक्के पाणीसाठा आहे. सातारच्या उरमोडी धरणात १२. ७९ टक्के, धोम धरणात २६.१२ पाणीसाठा आहे.

उजनी प्रकल्प कोरडा पडला असून वापरण्यायोग्य पाणीसाठा शिल्लक नाही. कोकण विभागातील पाणीसाठा ४५ टक्क्यांवर असून सहा विभागांमध्ये सरासरी ३१. ८० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालघरच्या मध्य वैतरणा प्रकल्पात ९ टक्के पाणीसाठा आहे.

‘लघू’मध्ये ३०, ‘मध्यम’ध्ये ८९ टक्के पाणीसाठा

राज्यातील लघू प्रकल्पांमध्ये केवळ ३०. ५९ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये ३८. ९३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मोठ्या प्रकल्पांत ३०.७० टक्के पाणीसाठा असून हा साठा वेगाने घटत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com