Water Scarcity : भीमा उजनीसह राज्यातील १६ लहान धरणातील उपायुक्त पाणीसाठा शून्यावर

Water Storage : एप्रिल महिन्याच्या मध्यावधीतच राज्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या असून राज्यातील सुमारे १६ लहान धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon

Pune News : गेल्या हंगामात पावसाने उसंत घेतल्यामुळे यंदा राज्यातील धरणांच्या जलाशयांमधील साठ्याची स्थिती फारशी चांगली नाही. राज्यातील अनेक मोठे, लघू आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीासाठ्यात घट होत आहे. राज्यातील मोठ्या धरणामधील पाणीसाठा रविवारी (ता.१४) ३२.७२ टक्क्यांवर आला असून मध्यम धरणांमध्ये ४०.०७ टक्के पाणीसाठा आहे. तर राज्यातील २५९६ लघु प्रकल्पांमध्ये ३१.५४ टक्केच उपयुक्त पाणीसाठी उरला आहे. या परिस्थितीमुळे यंदा पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान सर्वांत कमी उपयुक्त पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उरला असून सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख असणाऱ्या भीमा उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर आला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरसह राज्यावर यंदा पाणीटंचाईचे सावट दिसत आहे.

राज्यातील जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्व धरणांचा पाणीसाठा हा ३३.५५ टक्के आहे. तर तो गेल्या वर्षी याच दिवशी ४१.७५ टक्के होता. तर सर्व १३८ मोठ्या धरणामधील पाणीसाठा ३२.७२ टक्क्यांवर आला असून तो मागील वर्षी ३९.८२ टक्क्यांवर होता.

Ujani Dam
Water Scarcity : इगतपुरीतील वाड्या-पाड्यांत पाणीटंचाई

छत्रपती संभाजीनगर

वाढत्या उन्हाच्या झळा आणि धरणातील आटणारा पाणीसाठा यामुळे छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील जनतेची चिंता वाढत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर विभागात येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्ह्यातील ४४ धरणांमध्ये फक्त १७.६१ पाणीसाठी शिल्लक राहीला आहे. लातूर जिल्ह्यातील बिंडगीहाळ, शिवनी, टाकळगाव देवळा या धरणातील पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यात देखील ६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के झाला असून नांदेड जिल्ह्यातील ढालेगाव धरणात पाणीसाठी ०.०० टक्क्यांवर आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये देखील ४ धरणांनी उपयुक्त पाणीसाठ्याची मर्यादा ओलांडली असून येथील माजलगाव धरणाने जिल्ह्याची चिंता वाढवली आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठ देखील शून्य टक्क्यांवर आल्याने बीडकरांवर पाणीबाणी आली आहे.

तर जायकवाडी धरणातील सध्या पाणीसाठा १५.६२ टक्के असून गेल्या वर्षा याच दिवशी धरणात ५२.३६ टक्के पाणीसाठा होता. सध्या जायकवाडी धरणात उपयुक्त पाणीसाठा ३३९.११ (द.ल.घ.मी) शिल्लक असून अजून पावसाळा दीड-दोन महिने लांब आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख असणाऱ्या भीमा उजनी धरणात देखील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या या या धरणातील उपयुक्त साठा शून्यावर गेला असून तो मागील वर्षी याच दिवशी १७.९९ टक्के होता.

२०९३ टँकरने पाणीपुवठा

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील जलसाठ्यांनी तळ गाठला. कूपनलिका, विहिरींची पाणीपातळी घटली आहे. नदीसह बंधारे कोरडेठाक पडले आहेत. यामुळे राज्यातील सुमारे १६६५ गावे आणि ३९९९ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात सद्यस्थितीला २०९३ टँकरने पाणीपुवठा केला जात असल्याची माहिती जलसंपदा विभागाने टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवठ्याची स्थितीतून १२ एप्रिल रोजी दिली आहे.

Ujani Dam
Water Storage : परभणीतील मध्यम प्रकल्पात २ टक्के, तर लघु प्रकल्पात ६ टक्के शिल्लक पाणीसाठा

या माहितीच्या आधारे सर्वाधिक टँकर छ. संभाजी नगर विभागात फिरत असून छ. संभाजी नगर जिल्ह्याला ४४३ टँकर लागत आहेत. त्यापाठोपाठ जालना-३४३, नाशिक- २३८, अहमदनगर-१५८, पुणे-११६, सातारा -१६० आणि बीड जिल्ह्यास १९९ टँकर लागत आहेत.

१४८७ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत टंचाई निवारण्यासाठी १४८७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरीतून टँकर व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी ४९८ तर टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी ९८९ विहिरी अधिग्रहित आहेत.

पाणीसाठ्याची विभागनिहाय स्थिती

कोकण : ४६.८६ %

अमरावती : ४६.५१ %

नागपूर : ४४.४४ %

छ. संभाजीनगर : १६.७४%

पुणे : ३१.३९ %

नाशिक : ३४.६४ %

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com