Ahmednagar Dam Water Update : नगर जिल्ह्यातील धरणांत ४० टीएमसी पाणीसाठा

Dam Water Level : माॅन्सूनच्या पावसाने विश्रांती घेतल्याने नगर जिल्ह्यातील प्रमुख १२ धरणांमध्ये एकूण सुमारे ४०.७७ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on: 
Updated on: 

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील पावसामुळे नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांत पाणीसाठा चांगला झाला. जिल्ह्यातील प्रमुख धरणे, मध्यम, लघू पाटबंधारे तलावाची एकूण ५५.३० टीएमसी पाणीसाठवणक्षमता असून त्यातील ४०.७७ टीएमसी (७२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. उत्तरेतील धरणामुळे पाणीसाठवण अधिक दिसत असली तरी दक्षिणेतील सर्व गाव, पाझर, लघू पाटबंधारे तलावात मात्र अल्प पाणी आहे. जलसंपदा विभागाचे माजी अभियंता हरिचंद्र चकोर यांनी ही माहिती दिली.

Water Storage
Rain Update : मागच्या अडीच महिन्यात फक्त ४५ टक्के पाऊस, दुष्काळाचे सावट

हरिश्‍चंद्र चकोर यांनी सांगितले, की नगर जिल्ह्यातील प्रत्यक्ष सिंचनासाठी वापरात असलेल्या एकूण अंदाजे ३२ मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांचा एकूण पाणीसाठा साधारणपणे ५५.३० टीएमसी इतका आहे. आजचा विचार केला तर नगर जिल्ह्यातील प्रमुख १२ धरणांमध्ये एकूण सुमारे ४०.७७ टीएमसी इतका पाणीसाठा झाली आहे. नगर जिल्ह्यातील प्रमुख १२ धरणांमध्ये भंडारदरा, मुळा व निळवंडे या मोठ्या धरणांचा समावेश आहे.

मध्यम प्रकल्पात आढळा, सीना, मांडओहोळ, खैरी, घाटशीळ पारगाव व विसापूर सह पिंपळगाव खांड या धरणांचा समावेश होतो. सद्यःस्थितीमध्ये भंडारदरा, निळवंडे व मुळा या मोठ्या धरणांमध्ये सरासरी ८७ टक्के पाणीसाठा झालेला आहे. आढळा मध्यम प्रकल्पात देखील सरासरी ८५ टक्क्यांपर्यंत पाणी जमा झालेले आहे. भंडारदरा धरणात जून २०२३ अखेर सुमारे ४८.८० टक्के, निळवंडे धरणात २१ टक्के, मुळा धरणात ३३ टक्के, आढळा धरणांत सुमारे ५०.६६ टक्के साठा शिल्लक होता. दक्षिण नगर जिल्ह्यात मात्र पाणीसाठवण स्थिती गंभीर आहे. दक्षिणेतील सीना, खैरी, प्रकल्पासह असलेले चार मध्यम प्रकल्प व घोड धरणातील साठा चाळीस टक्के आहे.

Water Storage
खरिपाच्या पेरण्या  नगरमध्ये साठ टक्क्यांवर

हरिश्‍चंद्र चकोर यांनी सांगितले, की भंडारदरा व मुळा धरणांचे पाणलोट क्षेत्रातील कोकणकडा घाट माथ्यावरील घाटघर येथील पर्जन्यमान गतवर्षीपेक्षा सुमारे ८८० मिलिमीटरने कमी झालेले आहे. भंडारदरा व निळवंडे धरणांमधून देखील ओव्हर फ्लोचे पाणी त्यामुळे सोडता आले नाही. जायकवाडीतही पाणी कमी आहे.

त्यामुळे पाऊस चांगला झाला नाही तर १५ ऑक्टोबर २०२३ अखेरचा जायकवाडी धरणामधील उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन समन्यायी वाटप कायदा २००५ मधील  तरतुदीनुसार नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी धरण समूहातून व अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा व मुळा, नदीवरील भंडारदरा निळवंडे व मुळा धरणातून कदाचित पाणी जायकवाडी धरणात सोडावे लागेल की काय याविषयीची चिंता लाभधारक शेतकऱ्यांमधून दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.