Water News Khardi : शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या शेजारी असलेल्या आदिवासी वाड्यावस्त्यावरील महिला सद्यस्थितीत पाण्यासाठी वणवण भटकत आहे.
कसारा विभागातील विहिगाव तेलमपाडा येथे टँकरने होत असलेला पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने महिलांना तीन किलोमीटरवर खाच खळग्यातील व डबक्यातील पाणी आणावे लागत आहे.
त्यामुळे या पाड्यावर रोज चार टँकरने पाणीपुरवठा करावा व येथे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विहिगाव ग्रामपंचयती अंतर्गत येणाऱ्या विहिगाव/तेलमपाडा
येथे ७५ घरे असून आहेत. सद्यस्थितीत येथील विहिरी कोरड्या पडल्या असून पाण्याचा स्रोत नसल्याने जानेवारीत येथे तिव्र पाणी टंचाई जाणवते. गावात शहापूर नगरपंचायतीकडून रोज एका टँकरने पाणीपुरवठा होत असतो.
परंतु एक टँकरने होत असलेला पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने येथील रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने वणवण भटकावे लागत आहे.
गावाजवळच साधारण दोन किमी अंतरावर मध्य वैतरणा धरण तसेच अशोका धबधबा आहे. या धरणातून १०० किमी अंतरावरील मुंबईला पाणीपुरवठा होत असतो.
परंतु लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे घराच्या समोर पाणी दिसत असूनसुद्धा येथे कुठलीही पाणीपुरवठा योजना राबवण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक रहिवाशी संताप व्यक्त करीत आहेत.
वाॅटरव्हिलची व्यवस्था करा
शासनाने वाटरव्हिलचे वाटप केल्यास महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली येईल. या वॉटरव्हिलच्या सहाय्याने पाणी रस्त्यावरून भरलेला वॉटरव्हिल ढकलत आणता येईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी ग्रासस्थांतून होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.