Water Shortage : चाळीसगाव तालुक्यातील नऊ प्रकल्प कोरडेठाक

सतत चार वर्षांपासून शंभर टक्के भरणाऱ्या आणि निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा झपाट्याने कमी होत आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon

Water Shortage सतत चार वर्षांपासून शंभर टक्के भरणाऱ्या आणि निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा (Water Stock) झपाट्याने कमी होत आहे. सद्यःस्थितीत धरणात २७ टक्के इतका पाणीसाठा आहे. यातच चाळीसगाव तालुक्यातील १४ लघू प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांचा जलसाठा हा शून्यावर गेला आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी संजीवनी ठरलेल्या नांदगाव (जि. नाशिक) तालुक्यातील गिरणा धरण सलग चार वर्षांपासून शंभर टक्के भरत आहे. २०१८ मध्ये या धरणाचा पाणीसाठा अवघा ४८ टक्के होता.

Water Shortage
Water Shortage In Yavatmal : पांढरवकडा तालुक्यातील १४ गावांना पाणीटंचाईच्या झळा

२०१९ मध्ये तो पुरता घसरून १९ टक्क्यांवर आला होता. दुष्काळाची झळ सोसणाऱ्या गिरणा पट्ट्यासह जिल्ह्याला सलग चार वर्षे धरण भरल्याने जीवदान मिळाले होते. गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जळगाव तालुक्यामध्ये पिण्याची टंचाई दूर होण्यास मदत होते.

Water Shortage
Water Shortage Update : राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी धरणांतील साठा घटला

एकच आर्वतनाची शक्यता

गिरणा धरणाची क्षमता २१ हजार ५०० दलघफूट इतकी आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांत गिरणेतील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे.

यंदा तो २७ टक्क्यांवर आल्याने चिंता व्यक्त होत आहे. सद्यःस्थितीत धरणातील पाणीसाठा पाहता, पावसाळा लांबल्यास गिरणा पट्ट्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

धरणातून आतापर्यंत सिंचनासाठी तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत. आता सिंचनाचे आवर्तन सोडणे शक्य नसले तरी पिण्यासाठी मात्र आणखीन एक आवर्तन सोडले जाऊ शकते.

नऊ लघू प्रकल्प कोरडेठाक

मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे मन्याड मध्यम प्रकल्पासह १४ लघु प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्प शंभर टक्के भरले होते. मात्र आज या सर्व प्रकल्पांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

एकाही लघू प्रकल्पात दहा टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा नाही. नऊ प्रकल्पांमध्ये तर शून्य टक्के जलसाठा असून, चार प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. मन्याड धरणही शंभर टक्के भरले होते. आज हे धरण १७ टक्क्यांवर आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com