Water Scarcity : साडेतीनशेवर गाववाड्यांत पाणी टंचाई

Water Shortage : उन्हाची तीव्रता वाढत असतानाच आता मराठवाड्यातील साडेतीनशेच्या वर गाववाड्यांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : उन्हाची तीव्रता वाढत असतानाच आता मराठवाड्यातील साडेतीनशेच्या वर गाववाड्यांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी साडेचारशेवर टँकरची व ५२० विहिरींच्या अधिग्रहणाची सोय केली आहे. माणसांच्या पिण्याच्या पाण्याचं व जनावरांच्या चाऱ्या कसेबसे भागेल, मात्र जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक भागांत गंभीर होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र आहे. जालना जिल्ह्यातील १०५ गावे व ३९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागते आहे. त्यामध्ये जालना तालुक्यातील २२ गावे व १० वाड्या, बदनापूर तालुक्यातील १६ गावे व १० वाड्या, भोकरदन तालुक्यातील ३४ गावे व ४ वाड्या, जाफराबाद तालुक्यातील ३ गावे, मंठा तालुक्यातील एक वाडी, अंबड तालुक्यातील ११ गावे, घनसावंगी तालुक्यातील १८ गावे व १४ वाड्या, भोकरदन शहराला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

पाणीटंचाईग्रस्त गाववाड्या व शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून १७८ टँकरची सोय करण्यात आली आहे. याशिवाय १९२ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित विहिरींमध्ये १४६ विहिरी टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी, तर ४६ विहिरी टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यात ५२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्यामध्ये गंगाखेडमधील २१, पालममधील १४, सेलूमधील ६ तर जिंतूरमधील ११ विहिरींचा समावेश आहे. त्या सर्व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आले आहेत.

Water Shortage
Water Scarcity : खानापूर तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली

कंधार तालुक्यात दोन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात ४७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्यामध्ये गेवराईतील १०, वडवणी येथील ५, अंबाजोगाई येथील १२, केजमधील १०, माजलगाव मधील ५, पाटोदा नगर परिषदेमधील प्रत्येकी पाच विहिरींचा समावेश आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील तीन वाड्यांना व एका गावाला पाणीटंचाईचा सामाना करावा लागतो आहे.

त्यासाठी दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. लातूर जिल्ह्यात ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्या संपूर्ण टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठासाठी अधिग्रहित आहेत. याशिवाय जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एका गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्या गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे.

धाराशिव जिल्ह्यात ५५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये धाराशिवमधील २७ लोहारामधील ५, कळंबमधील २३ विहिरींचा समावेश आहे. या सर्व विहिरी टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Water Shortage
Water Scarcity : जालना जिल्ह्यात १७२ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झळ अधिक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६९ गाव व ३६ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३८ गावे व १२ वाड्या, फुलंब्री तालुक्यातील २० गावे व एक वाडी, पैठण तालुक्यातील ३५ गावे व ८ वाड्या, गंगापूर तालुक्यातील २० गावे व ४ वाड्या, वैजापूर तालुक्यातील २८ गावे व ४ वाड्या, कन्नड तालुक्यातील ७ गावे, सिल्लोड तालुक्यातील २१ गावे व ७ वाड्यांचा समावेश आहे.

या पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गाववाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून २६९ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय जिल्ह्यातील १२७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरींमध्ये ६८ विहिरी टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी तर ५९ विहिरी टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com