Dimbhe Dam: डिंभे धरणातून उजव्या कालव्याला सोडले पाणी! ४५ गावांच्या शेतकऱ्यांना दिलासा

Irrigation Water Supply: पुणे जिल्ह्यात उन्हाच्या झळा तीव्र होत असताना डिंभे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील ४५ गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Dimbhe Dam
Dimbhe DamAgrowon
Published on: 
Updated on: 

Pune News: पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे धरणांतील पाण्याची मागणी वाढली आहे. हुतात्मा बाबू गेणू सागर डिंभे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील ४५ गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या परिसरातील पिण्याचे पाणी तसेच शेतीपिकांना याचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Dimbhe Dam
Dimbhe Dam Water : डिंभे धरणातून चार दिवसांत २.८७ टीएमसी पाण्याचा विसर्ग

खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे डिंभे धरणाचा उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. वळसे पाटील यांनी अनिल वाळुंज व शेतकऱ्यांनी केलेली मागणी मान्य करून जलसंपदा विभागाला पाणी सोडणे संदर्भात सूचना केल्या होत्या. जलसंपदा विभागाने पाण्याचे नियोजन करून डिंभेच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले आहे.

आंबेगावच्या पूर्व भागातील व शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांचा कालव्यालगत असणाऱ्या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांना शेती पिकांना पाणीपुरवठा होतो. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असून या उन्हामुळे अनेक विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे.

Dimbhe Dam
Marathwada Water Issue : समन्यायी कायद्यानुसारच पाणी मिळविणार ; मराठवाडा पाणी परिषदेचा निर्धार

त्यामुळे डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या काठावरील गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे. शेती पिकांनाही पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने शेती पिके ही सुकू लागली आहेत. सध्या या परिसरामध्ये कांद्याचे पीक हे महत्त्वाचे पीक म्हणून घेतले जाते.

कांद्याचे पीक दोन महिन्याचे झाले असून अजून एक दोन महिने कांद्याच्या पिकाला पाण्याची गरज आहे. त्यामुळे पिकांसाठी पाण्याची अत्यंत गरज होती. हुतात्मा बाबू गेणू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतीपिकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com