Bhatghar Dam : टंचाईमुळे भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद

Bhatghar Dam Storage : अवघा अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक
Bhatghar Dam
Bhatghar DamAgrowon

Pune News : भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण जलाशयात केवळ ३.४९ टीएमसी म्हणजेच १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी १८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत धरणात ८ टक्के पाणीसाठा कमी असल्याने धरण प्रशासनाने धरणातील पाण्याचा विसर्ग बंद केला आहे.

मागील वर्षी, तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर ही दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. नीरा देवघर धरणात १२ टीएमसी, तर भाटघर धरणात २४ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या भाटघर धरणात १० टक्के पाणीसाठा राहिल्याने पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. मागील वर्षी धरणात १८ टक्के पाणीसाठा होता. तर नीरा देवघर धरणात १९ टक्के पाणीसाठा असून, धरणातून २३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील वर्षी धरणात ४५ टक्के पाणीसाठा होता. गत वर्षीच्या तुलनेत २१ टक्के पाणीसाठा कमी आहे.

Bhatghar Dam
Bhatghar Dam : जोगवडी येथे भाटघर धरणक्षेत्रात अतिक्रमण

गुंजवणी धरणात ०.८४४ टीएमसी म्हणजेच २२ टक्के पाणीसाठा असून धरणातून ३०० क्युसेकने पाणी विद्युतगृहासाठी सोडले आहे. तर, मागील वर्षी धरणात ३५ टक्के पाणीसाठा होता. म्हणजे धरणात १३ टक्के साठा कमी आहे, तर वीर धरणात सध्या २७ टक्के साठा असून मागील वर्षी ४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. भाटघर, नीरा देवघर, वीर, गुंजवणी या चारही धरणांत १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ६.९२ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. गत वर्षीच्या तुलनेने ३० टक्के पाणीसाठा असून १४.६४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मागच्या तुलनेत आठ टक्के पाणीसाठा कमी आहे. तीनही धरणांतील पाण्याच्या विसर्गामुळे पाणीसाठा कमी राहिला आहे. भोर वेल्हेबरोबरच पूर्व भागातील गावांतही मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.

धरण उशाला आणि कोरड घशाला
भोर तालुक्यात दोन-दोन धरणे असताना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच, नळपाणी योजनाही बंद पडत असून ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’, अशी अवस्था होत असून उन्हाचा पारा वाढत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. सात गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणे म्हणजे टँकरमुक्तीची घोषणा कागदावरच राहणे होय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com