Bhatghar Dam : जोगवडी येथे भाटघर धरणक्षेत्रात अतिक्रमण

Encroachment : भाटघर धरणाच्या पात्रालगत गाळ काढण्याचा परवाना घेऊन प्रत्यक्षात धरण क्षेत्रातच बेकायदा उत्खनन केले जात आहे.
Bhatghar Dam
Bhatghar DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : भाटघर धरणाच्या पात्रालगत गाळ काढण्याचा परवाना घेऊन प्रत्यक्षात धरण क्षेत्रातच बेकायदा उत्खनन केले जात आहे. ताल बांधून अतिक्रमण केले आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करूनही अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप जोगवडी येथील काही शेतकऱ्यांनी केला आहे.

जोगवडी (ता.भोर) भाटघर धरण पात्रात सुरेश बबन धुमाळ व मंगेश सुरेश धुमाळ यांनी स्वतःच्या मालकीची जमिनी सोडून धरण पात्रात अतिक्रमण केला असल्याचा आरोप येथील शेतकरी गणपत बळवंत धुमाळ यांनी केला आहे.

Bhatghar Dam
Stop Encroachment : अतिक्रमणे थांबवणार कोण?

भाटघर धरण क्षेत्रात धुमाळ भावकीची मिळून सर्व्हे न. १ मध्ये गट. न. ४३ व ५१ या मधील क्षेत्र ०.८३ पैकी सुरेश धुमाळ व मंगेश धुमाळ यांना ०.८० आर क्षेत्र कुळकायद्याप्रमाणे मिळाले आहे. त्यांनी स्वतःच्या हिश्श्याची जमिनी सोडून धरण पात्रात अतिक्रमण केले असून, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कारवाई करण्याची मागणी गणपत धुमाळ यांनी केली आहे.

Bhatghar Dam
Forest Land Encroachment : अतिक्रमणाचा प्रश्‍न सुटण्याची आशा

दरम्यान, मंगेश धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता आमचे क्षेत्र धरणाच्या रेड झोनमध्ये येत नसून, मालकी जमिनीच्या हिश्यातच नकाशा नुसार शेतीसाठी गाळ काढला आहे. गाळ काढत असताना जलाशय पात्रातून दगड धोंडे येत असतात ते एका बाजूला लावले आहेत.

आम्ही अतिक्रमण केले नाही. दरम्यान, तहसीलदार सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ''पाटबंधारे विभागाच्या हद्दीतला विषय असून, पाटबंधारे विभागाने आम्हाला कारवाई करण्याचे पत्र दिल्यानंतर आम्ही पंचनामा करू असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com