Chhatrapati Sambhajinagar News : कोणत्याही फळपिकांमध्ये फळवाढीच्या अवस्थेत पाणी व्यवस्थापन काटेकोर पद्धतीने केल्यास उत्पादन वाढीस मदत होऊन आर्थिक फायदा होत असल्याचे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ संजय पाटील यांनी केले.
मोसंबी संशोधन केंद्राच्यावतीने सैयदपूर (ता. छ. संभाजीनगर) येथे बुधवारी (ता. २४) आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते. या वेळी प्रक्षेत्रावर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) डॉ. दीपक कचवे, मोसंबी बागायतदार मुरलीधर डवणे, अप्पासाहेब डवणे, संदीप गवारे, गणेश जाधव, कचरू शेळके, कैलास डवणे यासह भागातील शेतकरी मोठ्या प्रमानात उपस्थिती होती.
या भेटीवेळी डॉ. पाटील म्हणाले, की सद्यःस्थितीत मोसंबी पिकाची आंबिया बहराची फळे १००-१५० ग्रॅम वजनाची असून वाढीच्या अवस्थेत आहेत. वातावरणातील तापमानाचा पारादेखील जास्त आहे, या वेळी झाडांना पाण्याची गरज जास्त असते, म्हणून सिंचनाकडे अधिक काटेकोर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन तज्ज्ञांकडून करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.