Orchard Cultivation : हिंगोली जिल्ह्यात १ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे नियोजन

Orchard Planting : हिंगोली जिल्ह्यात यंदा २०२३-२४ मध्ये कृषी विभागाच्या विविध योजनाअंतर्गंत मिळून एकूण १ हजार ४२५ हेक्टरवर फळबाग लागवडीचे नियोजन आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Orchard Cultivation
Orchard CultivationAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदा २०२३-२४ मध्ये कृषी विभागाच्या विविध योजनाअंतर्गंत मिळून एकूण १ हजार ४२५ हेक्टरवर फळबाग लागवडीचे नियोजन आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गंत यंदा (२०२३-२४) जिल्ह्यात एकूण ५०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट त्यात हिंगोली, कळमनुरी तालुक्यात प्रत्येकी १०० हेक्टर, वसतम, सेनगाव तालुक्यात प्रत्येकी १०० हेक्टर तर औंढा नागनाथ तालुक्यात ८० हेक्टरचा समावेश आहे.

Orchard Cultivation
Horticulture Scheme : फळबाग लागवड योजना ; अनुदानासह शेकऱ्यांना देणार मोफत रोपे

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गंत ड्रॅगन फ्रूट १५ हेक्टर, केळी ८० हेक्टर, करवंद १० हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण ८२० हेक्टरवर फळबाग लागवडीचे नियोजन आहे.

त्यात हिंगोली तालुक्यात २७४ हेक्टरचे नियोजन असून त्यात लिंबू ४९ हेक्टर व आंबा ११२ हेक्टर समावेश आहे. कळमनुरी तालुक्यात ३२४ हेक्टरवरचे नियोजन आहे. त्यात संत्रा १७० हेक्टर, डाळिंब २९ हेक्टर यांचा समावेश आहे.

वसमत तालुक्यातील नियोजित १७५ हेक्टरमध्ये पेरू १७८ हेक्टर व जांभुळ ५ हेक्टरचा समावेश आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील नियोजित २८५ हेक्टरमध्ये सीताफळ १६१ हेक्टर व अंजीर ३ हेक्टरचा समावेश आहे.

सेनगाव तालुक्यातील नियोजित ४०८ हेक्टरमध्ये चिकू ३५ हेक्टर व मोसंबी ७८ हेक्टर या फळपीकांचा समावेश आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com