Dam Water : नगर जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग बंद

Nagar Rain Update : नगर जिल्ह्यात यंदा पावसाने लवकर सुरुवात केली आणि आतापर्यंत पाऊसही चांगला असल्याने पिकांची परिस्थिती चांगली आहे.
Bhandardara Dam
Bhandardara DamAgrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यातल्या उत्तर भागातील धरणे भरलेली आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू होता. मात्र काही दिवसांपासून पाणलोटात पाऊस बंद झाल्याने पाण्याची आवक थांबली. त्यामुळे धरणातून विसर्गही थांबवला आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. धरणात फारसा पाणीसाठा नाही.

नगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, आणि निळवंडे हे दक्षिण भागातील प्रमुख धरणे असून अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील पावसावर ही धरणे अवलंबून आहेत. नगर जिल्ह्यात यंदा पावसाने लवकर सुरुवात केली आणि आतापर्यंत पाऊसही चांगला असल्याने पिकांची परिस्थिती चांगली आहे.

Bhandardara Dam
Nazre Dam : नाझरे धरण शंभर टक्के भरले, बळीराजा आनंदात

अकोले तालुक्यातील पश्चिम भागात मागील पंधरा दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे ११ टीएमसी क्षमतेचे भंडारदरा, साडेआठ टीएमसी क्षमतेचे निळवंडे धरण भरले, २६ टीएमसी क्षमतेच्या धरणातही २३ टीएमसी पाणी नियंत्रित ठेवत मुळासह तीनही धरणातून विसर्ग सुरू होता.

हे पाणी मराठवाड्यातील जायकवाडीकडे जात होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे धरणातून आता विसर्ग बंद केला आहे. रविवारी (ता. १८) सकाळी केवळ निळवंडे धरणातून १४०७ क्युसेकने विसर्ग सुरू होता. मात्र खाली ओझर बंधाऱ्यातून विसर्ग बंद आहे.

Bhandardara Dam
Monsoon Rain : पहिल्याच पावसात २१ तलाव फुटले

उत्तर भागात धरणे भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. मात्र दक्षिण भागातील घाटशीळ पारगाव, खैरी, सीना, मांडओहळ यांसह इतर गावतलाव, पाझर तलाव, तसेच अन्य स्त्रोत कोरडे असून काही दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांसाठीही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

या भागात परतीचा पाऊस जोरदार पडतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा परतीच्या पावसावरच दक्षिण जिल्ह्याची मदार राहणार असल्याचे दिसून येत आहे.

धरणातील रविवारचा पाणीसाठा (टक्के)

भंडारदरा ९६.२६

निळवंडे ९१.१२

मुळा ८८.७५

आढळा १००

भोजापूर ९६.६८

पिंपळगाव जोगा ३५.८८

मांडओहळ ७.३१

सीना ३४.३८

खैरी ७३

विसापूर ८४.९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com