Water Scarcity : पाणीटंचाई निवारणासाठी केवळ साडेसतरा लाखांचा कृती आराखडा

Water Crisis : यंदा कडक उन्हाळा जाणवणार असल्याची शक्यता आहे. तालुक्यातील काही गावांत नागरिकांना पाणीटंचाई भेडसावू शकते.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे गृहीत धरून पंचायत समिती प्रशासनाने केवळ १७ लाख ४६ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. गतवर्षी संभाव्य टंचाई कृती आराखड्यात सुमारे सहा कोटी रुपयांची तरतूद केली होती.

यंदा कडक उन्हाळा जाणवणार असल्याची शक्यता आहे. तालुक्यातील काही गावांत नागरिकांना पाणीटंचाई भेडसावू शकते. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील सर्व प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

Water Scarcity
Water Scarcity : जळगावातील ५२७ गावांत पाणीटंचाई

त्यामुळे काही गावे वगळता पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही; परंतु यंदा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यांपासून उन्हाची तीव्रतेत वाढ होताना दिसत आहे. भर उन्हाळ्यात तलाव, विहिरींच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पातळीत घट होते.

त्यामुळे काही गावांना टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता असल्याने पंचायत समिती प्रशासनाने दोन टप्प्यात संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. पहिला टप्पा ३१ मार्च अखेरपर्यंत टंचाई कृती आराखड्यात खर्चाची तरतूद केली नाही.

Water Scarcity
Water Scarcity : पुरंदरच्या पिसे गावाला अजूनही पाणीटंचाईचा फटका ; होतोय टँकरने पाणीपुरवठा

एक एप्रिल ते ३० जूनपर्यंतच्या दुसरा टप्प्यासाठी कृती आराखड्यात १७ लाख ४६ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी मार्च अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यासाठी एक कोटी सात लाख ८० हजार रुपये, तर एप्रिल ते जून या दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल चार कोटी ३९ लाख नऊ हजार रुपयांचा टंचाई कृती आराखडा होता.

...विंधन विहिरींच्या अधिग्रहणावर भर

पाणीपुरवठ्याची इतर कोणतीही योजना न राबविता केवळ खासगी विहिरी अधिग्रहणांवर अधिक भर दिला आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या सास्तूर या गावासाठी तीन विहिरी अधिग्रहण तर उर्वरित ३१ गावांसाठी प्रत्येकी एक खासगी विंधन विहिरी अधिग्रहण करण्याची तरतूद टंचाई कृती आराखड्यात करण्यात आली आहे. १७ लाख ४६ हजारांचा निधी केवळ अधिग्रहणावर खर्च केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com