Buldana Water Crisis : बुलडाण्यात केवळ ३२.६५% पाणीसाठा उपलब्ध

Water Scarcity : पाण्याची उपलब्धता लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Buldana News : जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत १५२.७८६ दलघमी (३२.६५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या असून, त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १७ गावांमध्ये १९ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकळी या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ७१.६६२ दलघमी(३२.१८ टक्के) तर ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पामध्ये ५३.६८० दलघमी (३७.८९ टक्के) व ४१ लघू प्रकल्पांमध्ये २७.४४४ दलघमी (२६.४९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.

Water Crisis
Water Crisis : कुर्ले धरणातील गाळामुळे पाणीकपातीचे संकट

प्रकल्पनिहाय उपलब्ध साठा

सध्या नळगंगा प्रकल्पामध्ये ३५.३२ दलघमी (५१ टक्के), खडकपूर्णा प्रकल्पामध्ये ८.३२ दलघमी (९ टक्के), पेनटाकळी प्रकल्पामध्ये २८.०२ दलघमी(४७ टक्के) या तीन मोठ्या प्रकल्पामध्ये एकूण ७१.६६२ दलघमी (३२.१८८ टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे. ज्ञानगंगा प्रकल्पामध्ये २२.०५ दलघमी(६५ टक्के), मस प्रकल्पामध्ये ५.२४ दलघमी (३५ टक्के), कोराडी प्रकल्पामध्ये ३.६९ दलघमी (२४.४० टक्के),

पलढग प्रकल्पामध्ये १.२४ दलघमी (१७ टक्के), मन प्रकल्पामध्ये १४.३६ दलघमी (३९टक्के), तोरणा प्रकल्पामध्ये ०.७५ दलघमी (१० टक्के), उतावळी प्रकल्पामध्ये ६.३५ दलघमी (३२ टक्के) असे एकूण सात मध्यम प्रकल्पामध्ये ५३.६८ दलघमी (३७.८९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच एकूण ४१ लघू प्रकल्पांमध्ये २७.४४४ दलघमी (२६.४९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.

Water Crisis
Water Crisis : नांदेडमध्ये पाणीसाठ्यात झपाट्याने घट

पाच तालुक्यांत १९ टँकर सुरू

पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १७ गावांसाठी १९ टँकर पाणीपुरवठ्याकरिता मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील ६, बुलडाणा येथे पाच, चिखली येथे तीन, सिंदखेडराजा येथे एक अशा १५ गावांसाठी प्रत्येकी एक टँकर तर देऊळगावाराजा येथील दोन गावांसाठी चार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टँकरग्रस्त गावे

मेहकर तालुक्यातील पारडी, जवळा, हिवरा साबळे, वरवंड, बोथा व पाथर्डी, बुलडाणा तालुक्यांतील पिंपळगाव सराई, सैलानी, ढासाळवाडी, पिंपरखेड व चौथा, चिखली तालुक्यातील कोलारा, श्रीकृष्णनगर व भालगाव, सिंदखेड राजा तालुक्यातील सारगाव माळ, देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, निमखेड येथे एक टँकरद्वारे दररोज पुरवठा करण्यात येत आहे.

उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षा घेता नागरिकांना पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तीव्र पाणीटंचाईच्या भागांमध्ये खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. ग्रामीण भागातील १०८ गावांत ११८ विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा देखील केला जात आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी जपून पाणी वापरावे आणि त्याचा अपव्यय टाळावा. प्रशासन आपल्या स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे.
- डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com