Tanker Water Supply : सोलापूर जिल्ह्यातील २६ गावांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Crisis Solapur : सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यात आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी टँकरची संख्या मर्यादित राहिली आहे.
Water Tanker
Water Tanker Agrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील २६ गावांना सध्या ३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यात आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी टँकरची संख्या मर्यादित राहिली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सातत्याने टंचाईचा आढावा घेतला जात आहे.

यावर्षी देखील जूनपासूनच पावसाचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. त्यामुळे टँकरची गरज यापुढील काळात कमी होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरमध्ये माळशिरस तालुक्यातील १४ गावांमध्ये प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे.

Water Tanker
Nanded Water Crisis : नांदेडमध्ये मध्यम, लघू प्रकल्पांनी गाठला तळ

त्यामध्ये गारवाड, मगरवाडी, सुळेवाडी, बचेरी, लोणंद, लोंढे मोहितेवाडी, कोथळे, शिवारवस्ती, निटवेवाडी, पळसमंडळ, भांब, फडतरी, कदमवाडी या गावांचा समावेश आहे. मंगळवेढा तालुक्यातील येड्राव, लक्ष्मीदहिवडी व आंधळगाव या तीन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

Water Tanker
Water Crisis : अमळनेर तालुक्यात १४ गावांना पाण्याची टंचाई

दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार गावांना टँकरने पाणी पुरवठा होत असून त्यामध्ये कणबस, इंगळगी, बंकलगी, दोड्डी या गावांचा समावेश आहे. अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे व वसंतराव नाईक नगर, उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले व पडसाळी, सांगोला तालुक्यातील राजापूर या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com