Healthy Fruit : आरोग्यदायी फळ : शिंगाडा

Water Chestnut : शिंगाड्यामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. शिंगाड्याच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते. त्वचा टवटवीत आणि मुलायम राहते. शिंगाड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते.
Shingada
ShingadaAgrowon
Published on
Updated on

साक्षी जिवतोडे, डॉ. विजया पवार

Benefits of Shingada : शिंगाडा पाण्यात वाढतो. यास कुरकुरीत चव आणि गोडसर स्वाद असतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व आणि खनिज पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. शिंगाड्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. नियमित सेवनाने केल्यास शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता भरून निघते.

पोषणमूल्य :

शिंगाडा हा पचनासाठी हलका आणि पोषणाने समृद्ध आहार आहे. यात पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने हिवाळ्यात शरीर हायड्रेट राहण्यात मदत होते. याशिवाय, जीवनसत्त्व क, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज, आणि अँटिऑक्सिडंट्स यांचा स्रोत असलेला शिंगाडा आरोग्यदायी आहे.

 जीवनसत्त्व क मोठ्या प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकला, आणि इतर मोसमी आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी शिंगाड्याचे सेवन फायदेशीर ठरते.

Shingada
Chestnut Crop : धानपट्ट्यात बहरतोय शिंगाडा

 हिवाळ्यात वातावरण थंड आणि शुष्क असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा धोका असतो. शिंगाड्याच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते. त्वचा टवटवीत आणि मुलायम राहते.

 शिंगाड्यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी याचे नियमित सेवन केल्यास त्यांना फायदा होतो. तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

शिंगाड्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देण्याचे काम करतात. थंड हवामानात त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो, मात्र शिंगाड्याचे सेवन केल्याने त्वचा मऊसर आणि टवटवीत राहते.

शिंगाड्यामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तातील सोडिअमचे प्रमाण संतुलित राहिल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

Shingada
Water Chestnut Price : शिंगाडा पोहोचला प्रति शेकडा ८० ते १०० रुपयांवर

शिंगाड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यास महत्त्वाचे ठरते. सांधेदुखी, दातांचे विकार कमी होण्यास मदत होते.

शिंगाड्यात अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे घशाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. घसा खवखवणे, टॉन्सिल्स आणि घशातील जळजळ यांसारख्या तक्रारींवर शिंगाडा उपयुक्त ठरतो.

ज्या व्यक्तींना झोपेचा त्रास होतो, त्यांनी शिंगाड्याचं सेवन केल्यास चांगली झोप लागते. यातील पोषक तत्त्वे मन शांत करण्यास आणि शरीराला आराम देण्यास मदत करतात.

पोषक घटक मात्रा (१०० ग्रॅम)

ऊर्जा ३६२ कॅलरी

प्रथिने ६.१ ग्रॅम

मेद (फॅट) ३.०७ ग्रॅम

कर्बोदके ७६.२ ग्रॅम

तंतुमय पदार्थ २.० ग्रॅम

कॅल्शिअम ५० मि.ग्रॅम

फॉस्फरस १६४ मि.ग्रॅम

लोह ३.२ मि.ग्रॅम

पोटॅशिअम ८४७ मि.ग्रॅम

सोडिअम २.६ मि.ग्रॅम

जीवनसत्त्व ब१ (थायमीन) ०.२३ मि.ग्रॅम

जीवनसत्त्व ब२ (रायबोफ्लॅविन) ०.३७ मि.ग्रॅम

जीवनसत्त्व ब३ (नायसिन) १० मि.ग्रॅम

साक्षी जिवतोडे ९३५६०७३९६५, डॉ. विजया पवार ९४२०६२६५३३

(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com