Land Issue : महामार्गांच्या विळख्यात माळराने

Waste Land : जगभरात आनुवंशिक विविधता, जाती विविधता आणि परिसंस्था विविधता असे जैवविविधतेचे प्रकार असतात. माळरानं ही यापैकी स्वतंत्र परिसंस्था आहे.
Waste Land
Waste Land Agrowon
Published on
Updated on

Solapur News : जगभरात आनुवंशिक विविधता, जाती विविधता आणि परिसंस्था विविधता असे जैवविविधतेचे प्रकार असतात. माळरानं ही यापैकी स्वतंत्र परिसंस्था आहे. सोलापूर जिल्हा हा कोणताही डोंगर नसलेला मात्र समृद्ध माळरान लाभलेला जिल्हा आहे. ही माळरानं महामार्गांच्या जाळ्यात विभागली जात आहेत. विभागलेल्या माळरानांवरील जैवविविधता टिकविण्याची जबाबदारी येथील पक्षी अभ्यासक व वनविभागाची आहे.

निसर्गसंपन्न गावांत सिमेंटची जंगले उभी राहू लागली आहेत. मात्र, सिमेंटची जंगले उभी करताना निसर्गनिर्मित माळराने नामशेष झाली आहेत. पर्यायाने माळरानावर वास्तव्यास असलेले लहान-मोठे जीव नष्ट होत आहेत. मात्र, दुरून भकास दिसणारी माळराने प्रत्यक्षात जाऊन अनुभवल्यानंतर बोलकी असल्याचे जाणवते. हा अनमोल ठेवा वनविभागाने तसेच पक्षी अभ्यासकांनी स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

Waste Land
Incomplete Highway : अपूर्ण महामार्गाचा ६०० गावांना फटका

माळराने असतात बोलकी स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास सरकारी दरबारी पडीक जमीन, गायराने अशा वेगवेगळ्या नावांनी नोंदवलेली असली तरी ती जमीन निसर्गासाठी निरुपयोगी नसते. माळराने ही निसर्गातील तितकीच महत्त्वाची परिसंस्था आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे तसेच महामार्गांच्या जाळ्यामुळे जिल्ह्यातील माळराने नष्ट होऊ लागल्याचे वास्तव आहे. अन्न साखळीतील प्रत्येक जिवाचे संवर्धन काळाची गरज बनले आहे. भारिट, रणगोजा, रंगीत गप्पीदास, भोवत्या यांसारखे काही पक्षी स्थलांतर करून जिल्ह्यात अधिवास करत आहेत. त्यांचे खाद्य माळरानावर लपलेले असते. वरवर भकास दिसणारी माळराने अत्यंत बोलकी असतात. शेकडो जिवांना अन्न व अधिवास देतात.

Waste Land
National Highway : देवळ्यात महामार्गाचे काम पाडले बंद

का साजरा केला जातो जैवविविधता दिन?

जगातील सर्व जिवांची गणती अजूनही सुरू आहे. कीटकांच्या नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत. जगातील माहीत असलेल्या जिवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. या विविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोचावी यासाठी हा ‘बायोडायव्हर्सिटी डे’ जगभर साजरा केला जातो.

सोलापूरच्या माळरानावर माळढोकासारख्या दुर्मिळ पक्ष्याचा अधिवास आहे. ही येथील माळरानाच्या समृद्धीची निशाणी आहे. आज जरी एकच माळढोक असला तरी कृत्रिम प्रजननानंतर त्यांच्या संख्येत निश्चित वाढ होईल. यासाठी आपण सोलापूरची माळराने जपणे आवश्यक आहे.
- डॉ. सुजित नरवडे, सहायक संचालक, बीएनएचएस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com