World Book of Records: वाशीमचा जलपराक्रम जागतिक पातळीवर; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्‌सने घेतली दखल

Water Conservation: वाशीम जिल्ह्याने अवघ्या ४० दिवसांत ४० हजार जलतारे (शोषखड्डे) बांधून जलसंधारण क्षेत्रात नवा इतिहास घडवला आहे. या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स - लंडन’ ने वाशीमचा सन्मान केला असून, हा जलपराक्रम संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक ठरतो आहे.
World Book of Records
World Book of RecordsAgrowon
Published on
Updated on

Washim News: वाशीम जिल्ह्याने भूजल पुनर्भरणाच्या दिशेने भक्कम पावले टाकत अवघ्या ४० दिवसांत ४० हजार जलतारा बांधून ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स - लंडन’मध्ये आपले नाव अजरामर केले आहे. इंदूर येथे आयोजित एका समारंभात राजस्थानचे माजी राज्यपाल कलराज मिश्र यांच्याहस्ते जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कामगिरीमुळे वाशीम जिल्हा संपूर्ण देशाच्या आणि जगाच्या नकाशावर प्रकाशमान झाला आहे.

वाशीम जिल्ह्यात या उपक्रमाअंतर्गत पारंपरिक जलसंवर्धनाच्या तत्त्वांवर आधारित जलतारा (शोषखड्डे) तयार करण्यात आले. जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांच्या नेतृत्वाखाली महसूल, कृषी, जलसंधारण, ग्रामविकास विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था आणि शेतकऱ्यांनी हे अभियान यशस्वी केले.

World Book of Records
Water Conservation Success : बनसावरगाव : पाणीदार अन् जलसाक्षरही

या जलक्रांतीमागे प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामगिरीबरोबरच शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांचा समर्पित सहभाग महत्त्वाचा ठरला. तहसीलदार, पोलिस प्रशासन, पंचायत समित्या, कृषी व जलसंधारण अधिकारी यांचेही मोलाचे योगदान राहिले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलतारा बांधण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. तर सामाजिक संस्थांनी जनजागृती, तांत्रिक मार्गदर्शन आणि श्रमदानाच्या माध्यमातून या अभियानाला लोकचळवळ बनवले. सन्मानपत्र स्वीकारण्यासाठी बुवनेश्‍वरी एस., यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके व इतर उपस्थित होते.

World Book of Records
Water Conservation : वाशीम जिल्हा बनतोय जलसंवर्धनाचा आदर्श

इंदूर येथे गौरव सोहळा

इंदूर येथे ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याच्या या कामगिरीची दखल घेण्यात आली. या वेळी सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन वाशीम जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला. या वेळी कलराज मिश्र यांनी आपल्या भाषणात वाशीम जिल्ह्याने संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्रोत निर्माण केला आहे. ही कामगिरी शाश्‍वत विकासाच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे, असे सांगितले.

हा सन्मान केवळ प्रशासकीय कामगिरीचा नाही, तर आपल्या सर्वांच्या एकत्रित मेहनतीचा परिपाक आहे. यापुढेही जलसंधारण, पावसाचे पाणी अडवणे, वृक्ष लागवड आणि शाश्‍वत शेतीसारखे उपक्रम हाती घेतले जातील.
बुवनेश्वरी एस., जिल्हाधिकारी, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com