Ashadhi Vari Update : वारकरी, भाविकांना सोयीसुविधा पुरवा

Pandharpur Yatra : पंढरपूर आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात.
Ashadhi Vari Update
Ashadhi Vari UpdateAgrowon
Published on: 
Updated on: 

Solapur News : पंढरपूर आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात.

पालखी तळ व मार्गावरील तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे सूचिबद्ध करून विहित वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी पालखी सोहळा व्यवस्थापनासाठी नेमणूक केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या.

Ashadhi Vari Update
Ashadhi Vari Yatra : पंढरपुरात यात्रा कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणाला बंदी

संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावरील करावयाच्या कार्यवाहीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, सहायक आयुक्त समाज कल्याण एन. आर. चौगुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादक शुल्क नितीन धार्मिक, तहसीलदार अमरदीप वाकडे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की पालखी महामार्गावरील प्रलंबित कामे, अडथळे वेळेत दूर करावेत. विसाव्याच्या ठिकाणी जाणे-येणेकरिता असलेल्या रस्त्याची डागडुजी करावी. पालखी मार्गावर आवश्यकेनुसार सर्व्हिस रोड, रँप (दोन स्वतंत्र रस्ते), जागेचे सपाटीकरण, मुरूम भराई करून रस्त्याचे मजबुतीकरण, स्वच्छता व इतर आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यासाठी कार्यवाही करावी.

पालखी तळाची साफसफाई करावी. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखीतळावर तसेच विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, असे त्यांनी सूचित केले. तसेच सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या विभागांशी व संपूर्ण पालखी मार्गावरील सेक्टर इन चार्ज यांच्याशी समन्वय ठेवावा. सर्व नोडल अधिकाऱ्यांना डिजिटल डायरी, पालखी मार्गाचे नकाशे देण्यात येतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.