Ashadhi Vari Yatra : पंढरपुरात यात्रा कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणाला बंदी

Pandharpur Yatra : पंढरपुरात आषाढीवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २० जून ते चार जुलै या कालावधीत पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर व पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Ashadhi vari Yatra
Ashadhi vari YatraAgrowon
Published on: 
Updated on: 

Solapur News : पंढरपुरात आषाढीवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २० जून ते चार जुलै या कालावधीत पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर व पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी याबाबतची अधिसूचना काढली आहे.

Ashadhi vari Yatra
Pandharpur Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी एसटीच्या ५ हजार विशेष बसची व्यवस्था

जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनेनुसार तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायामध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहाळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायामध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असते.

२१ जून ४ जुलै या कालावधीत आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, संत श्री सोपानदेव महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानाच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातून व इतर प्रांतातून लाखो भाविक वारकरी येत असतात.

२८ जूनला सर्व पालखी सोहळे पंढरपूर येथे एकत्र येतात. अलीकडील काळातील दहशतवादी घटनांचा विचार करता पालखी सोहळ्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच सदर पालखी सोहळ्यात व आषाढीवारी कालावधीत येणाऱ्या भाविक/वारकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त भाविक/वारकरी हे ग्रामीण भागातील असून त्यांना ड्रोन कॅमेरा ज्ञात नसतो.

त्यामुळे अचानक ड्रोनसारख्या साधनांद्वारे छायाचित्रण करण्यात आले, तर वारकऱ्यांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरीसारखा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.