Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त भक्तिरसात देऊळवाडा उजळला

Alandi Yatra : माऊलीचरणी आपली वारी समर्पित करण्यासाठी आलेल्या तीन लाख भाविकांच्या अखंड परिणामाने अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
Alandi Yatra
Alandi YatraAgrowon
Published on
Updated on

Pune News : फुलांची आकर्षक सजावट...रंगीबिरंगी विद्युतरोषणाईने उजळलेला देऊळवाडा...सनई चौघड्याचे मंजूळ स्वर अन् समाधी गाभाऱ्यातील ११ ब्रम्हवृंदांकडून मंत्रघोषासह सुरू असलेला माऊलीनामाचा अखंड नामघोष...अशा मंगलमय वातावरणात कार्तिकी एकादशीनिमित्त माऊलींना लाखो भाविकांच्या उपस्थितीत पवमान अभिषेक करण्यात आला.

माऊलीचरणी आपली वारी समर्पित करण्यासाठी आलेल्या तीन लाख भाविकांच्या अखंड परिणामाने अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. समाधी दर्शनासाठी रांगेतील भाविकांना तब्बल आठ तास लागत होते. तरीही माऊलींच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी अखंड हरिनामात दंग होते.

Alandi Yatra
Agriculture Drone : आता मिळणार बचत गटाकडून भाड्याने ड्रोन

रात्री साडे अकराला मुख्य दर्शन मंडपात येणारी भाविकांची रांग पवमान पूजेसाठी बंद केली. स्वकाम सेवा मंडळाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण देऊळवाडा स्वच्छ केला. घंटानाद झाल्यावर सव्वा बारा ते दीड वाजेपर्यंत माऊलींना अभिषेक व पूजा बांधण्यात आली.

पौराहित्य मंदार जोशी यांच्या आधिपत्याखाली केले. सिद्धेश्वर मंदिरात रुद्राभिषेक सुरू होता. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला. माऊलींना विविध वस्त्रे आणि दागिन्यांनी सजविण्यात आले.

Alandi Yatra
Alandi Kartili Wari : अवघी अलंकापुरी दुमदुमली...

अभिषेकानंतर माऊलींची आरती झाली. पहाटपूजा झाल्यानंतर निमंत्रित पासधारकांना प्रवेश दिला. त्यानंतर सर्वसामान्य भाविकांचे दर्शन सुरू केले. दरम्यान दुपारी एकला माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याबाहेर पडली.

आज रथोत्सव

परंपरेप्रमाणे माऊलींचा रथ आज (ता.१०) द्वादशीला सायंकाळी चारच्या दरम्यान नगरप्रदक्षिणेसाठी निघणार आहे. रात्री अकरा वाजता फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुखांना खिरापत पूजा, प्रसाद वाटप देवस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com