
Kolhaour News : दूध व्यवसाय क्षेत्रात धवलक्रांती झाली आहे सध्या दुधाच्या व्यवसायात दिवसेंदिवस बदल होत आहे यासाठी वारणा दूध संघ दूध उत्पादकांचे हित साधण्यासाठी नवनवीन प्रयोग राबवीत असून, परिसरातील दूध उत्पादकांनी संघाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन वारणा दूध संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांनी कळे येथे केले.
तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या कळे शाखेकडील नवीन दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटनप्रसंगी कोरे बोलत होते. कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी स्वागत करून संघाच्या ५७ वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला.
२००९ मध्ये सुरू झालेल्या कळे शीतकेंद्राची प्रगती स्पष्ट केली. सुळेचे दूध उत्पादक मच्छिंद्र पाटील, गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ शिंदे, शिवाजी कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. या वेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर जाधव यांना राष्ट्रीय स्तरावर सहकारी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दलचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कळे केंद्रासाठी सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या तुळजाभवानी दूध संस्था वेतवडे (ता. गगनबावडा), शुभलक्ष्मी दूध संस्था आंबर्डे (ता. पन्हाळा), लक्ष्मी दूध संस्था खुपीरे (ता.करवीर), शुभलक्ष्मी दूध संस्था नांदगाव (ता. शाहुवाडी) धनलक्ष्मी दूध संस्था मासुर्ली (ता. राधानगरी) संस्थांचा सत्कार करण्यात आला.
व्हिजन चॅरिटेबलचे अध्यक्ष संताजी घोरपडे, कोल्हापूर कृषी उत्पन्न समितीचे सभापती प्रकाश देसाई, पुनाळचे सरपंच बाजीराव झेंडे, कळेचे सरदार बाडे, श्यामराव पाटील, बळासाहेब पाटील उपस्थित होते. सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या संचालिका शितल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.