Wanrai Bunds : यंदा ५० हजार नवे वनराई बंधारे बांधणार

Water Conservation : राज्यात चालू वर्षात ५० हजार नवे वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Wanrai Bunds
Wanrai Bunds Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात चालू वर्षात ५० हजार नवे वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बंधाऱ्यांची उभारणी केल्यास किमान एक लाख हेक्टर शेतीसाठी संरक्षित सिंचन उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

मृद्‍संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे संचालक रवींद्र भोसले यांच्याकडून या योजनेचा आढावा अलीकडेच घेण्यात आला. “एका वनराई बंधाऱ्यामुळे सरासरी दोन हेक्टर शेतीला संरक्षित पाणी मिळू शकते.

त्यामुळे राज्यातील सर्व कृषी सहायकांच्या मदतीने क्षेत्रीय पातळीवर या योजनेला चालना द्यावी. प्रत्येक कृषी सहायकाला किमान ४ ते ७ बंधारे उभारणीचे उद्दिष्ट द्यावे,” अशा सूचना मृद्संधारण विभागाने सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Wanrai Bunds
Wanrai Bunds : पुणे जिल्ह्यात आतापर्यंत बांधले १२०० वनराई बंधारे

संरक्षित सिंचनासाठी कमी खर्चात व सहज बांधता येणारे तंत्र म्हणून वनराई बंधारे वर्षानुवर्षे उभारले जात आहेत. परंतु या बंधाऱ्यांची उभारणी करताना चुकीची मोजमापे केली जात असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने बंधाऱ्याची मोजमापे ठरवून दिली आहेत.

Wanrai Bunds
Wanrai Bunds : मंगरूळ नवघरेमध्ये उभारला श्रमदानातून वनराई बंधारा

बंधारा उभारणीसाठी पाणलोट क्षेत्राची अट लावलेली नाही. त्यामुळे पाणलोट क्षेत्राच्या आत किंवा क्षेत्राबाहेर देखील बंधारा उभारता येईल. मात्र बंधाऱ्यांची उभारणी करताना तांत्रिक निकष पाळावेत, कमी खर्चात कमाल पाणीसाठा होण्याचे उद्दिष्ट ठेवावे, उंची फक्त १.२० मीटरपर्यंत ठेवावी. तसेच गाव, वाडीच्या जवळच बंधारे बांधावेत, अशा महत्त्वाच्या सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत.

...असा बांधला जाणार वनराई बंधारा

- १.७५५ चौरस मीटर छेदाच्या व दहा मीटर लांबीच्या वनराई बंधाऱ्यासाठी पोती, वाळू व काळी माती याचाच वापर केला जाईल.

- बांधाच्या ०.६० मीटर लांबी भागासाठी पोत्यांच्या तीन थरांमध्ये १.७५५ चौरस मीटर × ०.६० मीटर लांबी ठेवली जाईल. ३९ पोती वापरली जातील व पोत्यांचे घनफळ १.०५३ घनमीटर असेल.

- वनराई बंधाऱ्याच्या बांधणीत पहिल्या थरात १२, दुसऱ्या थरात १५, तर तिसऱ्या थरात १२ पोती वापरली जातील.

- दहा मीटर लांबीच्या बांधासाठी एकूण ६५० पोती वापरली जातील. पायाचा बांधाचा छेद १.७५५, तर गाभा भिंतीचा छेद ०.३६० असा एकूण छेद २११५ चौरस मीटर इतका राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com