Loksabha Election 2024 : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान

Election Update 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता. १३) होत असून दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील ९६ जागांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Voting Update
Voting UpdateAgrowon

News Delhi : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता. १३) होत असून दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील ९६ जागांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्रातील पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना आणि छ. संभाजीनगर या ११ मतदार संघांत मतदान होणार आहे.

चौथ्या टप्प्यातील ९६ जागांसाठी १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आंध्र प्रदेशातील सर्वच्या सर्व २५ जागांसाठी तसेच तेलंगणमधील १७ आणि उत्तर प्रदेशातील १३ जागांसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे.

Voting Update
Loksabha Election 2024 : शिर्डीतल्या तिरंगी लढतीकडे लागले राज्याचे लक्ष

याशिवाय प. बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी ८, बिहारमधील ५, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी ४ तर जम्मू काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एकूण ३७९ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची सांगता होणार आहे.

तेलंगणामध्ये या वेळी अनेक मतदार संघांत हाय वोल्टेज लढती पाहावयास मिळत आहेत. हैदराबादमध्ये एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची लढत भाजपच्या फायरब्रॅंड नेत्या माधवी लता यांच्याशी होत आहे.

Voting Update
Loksabha Election : सोलापुरात मतदार यादीवरील तक्रारींची चौकशी होणार

सिकंदराबाद मध्ये भाजपचे विद्यमान खासदार जी. किशन रेड्डी यांची लढत बीआरएसच्या टी. पद्‌मा राव आणि काँग्रेसच्या डी. नागेंदर यांच्याशी होत आहे. करीमनगर मतदार संघात भाजपचे नेते बंडी संजय कुमार यांची लढत बीआरएसच्या बी. विनोद कुमार यांच्याशी होत आहे.

उत्तर प्रदेशातील कन्नौज मतदार संघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांचा मुकाबला भाजपच्या सुब्रत पाठक यांच्याशी होत आहे. लखीमपूर खिरी मतदारसंघात केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेणी यांची लढत सपाच्या उत्कर्ष वर्मा यांच्याशी होणार आहे.

जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी आमनेसामने आहेत. याठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सने आगा सय्यद रुहूल्ला मेहदी यांना तिकीट दिले आहे तर पीडीपीकडून वाहिद पारा हे मैदानात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com