Pune News : झारखंड राज्यातील ४३ जागांसह इतर १० राज्यातील ३१ आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाला बुधवारी (ता.१३) सुरूवात झाली आहे. झारखंडसह इतर ठिकाणी सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे.
एकीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी तर २० नोव्हेंवरला उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी महाराष्ट्रात देखील २८८ जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल लागेल.
झारखंडमध्ये इंडिया आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) थेट लढत होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत येथे १३.०४ टक्के मतदान झाले असून सिमडेगा येथे सर्वाधिक १५ टक्के आणि पूर्व सिंहभूममध्ये सर्वात कमी ११.२५ टक्के मतदान झाले आहे.
यादरम्यान झारखंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. ज्यात सांप्रदायिक ध्रुवीकरण आणि आदिवाशी समाजाला केंद्रीत ठेवण्यात आले.
यावेळी मोदींसह शाह यांनी हेमंत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना भाजपची सत्ता आल्यास अशा भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. यावर पटलवार करताना काँग्रेसने, भाजप १० वर्षांच्या सत्तेनंतरही केवळ धार्मिक ध्रुवीकरणावर मते मागत असल्याचा आरोप केला आहे.
गेल्या विधानसभेत काय होती परिस्थिती?
गेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने ३० जागा जिंकल्या होत्या. भाजपला २५ आणि काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या.
वायनाडमध्ये प्रियंका गांधी
केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेसच्या प्रियंका गांधी वढेरा, भाजपच्या नव्या हरिदास आणि सत्यन मोकेरी यांच्यात लढत होत आहे. यावेळी प्रियंका गांधी यांनी, वायनाडमधील एका बूथवर मतदारांची भेट घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, 'वायनाडच्या लोकांनी माझ्या भावाला, राहुलला खूप प्रेम दिले आहे. ते मलाही त्यांची सेवा करण्याची संधी देतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.